भारतीय लष्कर आपल्या कुत्र्यांना ठार मारायचं, यामागचं 'हे' होतं कारण

भारतीय लष्कर आपल्या कुत्र्यांना ठार मारायचं, यामागचं 'हे' होतं कारण

या खास कुत्र्यांना जखम झाली किंवा त्यांचा काही उपयोग राहिला नाही, तर गोळी मारून मारलं जायचं.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : कुत्रा म्हटलं की पहिल्यांदा समोर येते ती त्याची वफादारी, प्रामाणिकपणा. पण काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करातल्या कुत्र्यांच्या नशिबी प्रामाणिकपणाच्या बदल्यात मृत्यू होता. लष्कराचे कुत्रे सैनिकांप्रमाणेच काम करतात.

या खास कुत्र्यांना जखम झाली किंवा त्यांचा काही उपयोग राहिला नाही, तर गोळी मारून मारलं जायचं.

लष्कर या खास कुत्र्यांना देतं प्रशिक्षण

भारतीय लष्कर या कुत्र्यांना खास ट्रेनिंग देतात. बाँब हुंगणे आणि धोका ओळखण्याची त्यांची क्षमता वाढवली जाते. भारतीय सैन्याकडे जास्तीत जास्त लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, बेल्जियन शेफर्ड हे कुत्रे आहेत. हे कुत्रे रँकवरून नाही, तर नाव आणि नंबरावरून ओळखले जातात. यांचा वापर लष्कर विस्फोटक पदार्थ शोधण्यासाठी केला जातो. सेनेची घोडेस्वारी रेजिमेंट प्रसिद्ध आहे. उंच ठिकाणी माल वाहून नेण्यासाठी घोडे, गाढवं यांचा उपयोग केला जातो.

या कुत्र्यांच्या बुद्धीची क्षमता त्यांच्या जातीवर अवलंबून असते. म्हणून सगळे कुत्रे एकसारखे नसतात. त्यांना वेगवेगळी कामं दिली जातात. कुत्रे अशा ठिकाणी जाऊन शोध घेऊ शकतात, जिथे सैनिक पोचू शकत नाही.

लष्कर का असं करतं?

ही वाईट पद्धत इंग्रजांच्या काळापासून सुरू होती. भारतीय लष्कर देशाची सुरक्षा लक्षात घेऊन असं कृत्य करायची. लष्कराला भीती असायची की हे कुत्रे चुकीच्या लोकांच्या हाती आले तर... या कुत्र्यांना लष्कराच्या गुप्त जागांची माहिती असायची. त्यामुळे कुत्र्यांचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाला तर...

याशिवाय कुत्र्यांना गंभीर दुखापत झाली, ते आजारी पडले तर त्यांना मारलं जायचं. सुरुवातीला अशा कुत्र्यांवर उपचार केले जाता. पण काही सुधारणा झाली नाही किंवा त्यांचा उपयोग संपला तर गोळी मारली जाते.

फक्त कुत्रेच नाही तर घोडे, गाढवं यांनाही उपयोग संपल्यावर मारलं जायचं. याला अॅनिमल युथेनेशिया म्हणतात. ज्या कुत्र्यांना पुरस्कार मिळतो, त्यांना सोडलं जातं. लष्कराच्या कुत्र्यांचं आयुष्य 7 वर्ष असतं. त्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानापेक्षा अर्ध.

यांना दत्तक का दिलं जात नाही? त्यामागे असाही विचार असायची की लष्करानं तयार केलेल्या कुत्र्यांना लहान मुलांसोबत कसं ठेवणार? पुन्हा सैन्यात त्यांना जेवढी सुविधा मिळते, तेवढी दुसरीकडे मिळणं शक्य नाही.

2015पासून कुत्र्यांना न मारण्यासाठीचा सरकारचा प्रयत्न

2015मध्ये सरकारनं सांगितलं होतं की अशा कुत्र्यांना न मारता दुसऱ्या पर्यायांचाही विचार केला जाईल. आर्मी डाॅग्जना दत्तकही देत येईल. अनेक देशात तसे कायदे आहेत.

हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं होतं. कोर्टानं कुत्र्यांना ठार करणं हे कायद्याचं उल्लंघन म्हटलं होतं. 2017मध्ये मेरठमध्ये कुत्र्यांसाठी एज होम वॉर डॉग ट्रेनिंग स्कूल स्थापन केलं गेलंय. यावेळी लष्कर अधिकाऱ्यानं सांगितलं, वैद्यकीय उपचार संपतात तेव्हाच कुत्र्यांना मारलं जातं. भारतात कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांत कुत्र्यांना दत्तक घेण्याची सोय आहे.

वेगवेगळ्या देशांमध्ये निवृत्त लष्कराच्या कुत्र्यांसाठी आहे कायदा

अमेरिकेत निवृत्त आर्मी डाॅग्जना लोक दत्तक घेतात. ज्यांना दत्तक घेतलं जात नाही त्यांना एनजीओकडे सोपवलं जातं. तिथे त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत काळजी घेतली जाते. रशिया आणि चीनमध्येही कुत्र्यांना मारलं जात नाही. जपानला निवृत्त लष्करी कुत्र्यांसाठी हाॅस्पिटल आहे. तिथे इतर लोकही आपल्या आजारी कुत्र्यांना आणू शकतात. इथे कुत्र्यांची काळजी माणसांसारखी घेतली जाते.

First published: January 28, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading