Home /News /national /

 या राज्याने रमी आणि पोकरसारख्या ऑनलाइन गेमवर आणली बंदी; 2 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

 या राज्याने रमी आणि पोकरसारख्या ऑनलाइन गेमवर आणली बंदी; 2 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

केंद्र सरकारने तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या PUBG या ऑनलाइन खेळाच्या अॅपवर बंदी आणली आहे. त्यानंतर या राज्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे

    अमरावती, 3 सप्टेंबर : डेटा सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने चीनच्या पबजीसह 118 मोबाइल अॅप्सवर बंदी आणली. त्यानंतर देशातील एका राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh Cabinet) गुरुवारी चुकीच्या मार्गावर ढकलणाऱ्या  रमी (Rummy) आणि पोकर (Poker) सारख्या ऑनलाइन गेम (Online Games) वर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. सूचना मंत्री पी. वेंकटरमैया (नानी) यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाने (State Cabinet) ऑनलाइन सट्ट्यावर (Online Gambling) निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेवटी माध्यमांसोबत बातचीत करताना मंत्री म्हणाले की, ऑनलाइन सट्ट्याच्या सवयीमुळे तरुणांचं लक्ष भटकवून त्यांना नुकसान पोहोचवत आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी आम्ही तरुणांना वाचविण्यासाठी अशा सर्व ऑनलाइन सट्ट्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ऑनलाइन सट्ट्याच्या आयोजकांना पहिल्यांदा अपराधी आढळल्यास 1 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ते पुढे म्हणाले की दुसऱ्यांना दंडासाह 2 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. तर ऑनलाइन गेम खेळत असताना सापडल्यास 6 महिन्यांपर्यंत शिक्षा होईल. हेही वाचा-रशियन अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा लांबूनच नमस्कार, VIDEO व्हायरल एक दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पबजी गेमवर आणली बंदी आंध्रप्रदेश सरकारने हा निर्णय अशा वेळात आला आहे की जेव्हा एक दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पबजी (PUBG) सह 118 चिनी मोबाइल अॅप्सवर निर्बंध लावले आहेत. ऑनलाइन खेळणाऱ्या गेम्समघ्ये तरुणांमध्ये पबजी, पोकर आणि रमी प्रसिद्ध आहे. यासोबतच आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने इलेक्ट्रिक फिडरोच्या अपग्रेडेशन आणि कृषी उद्देशांसाठी 9 तास मोफत वीज प्रदान करण्यासाठी 1700 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने तब्बल 1 लाख अधिकृत  वीज कनेक्शन नियमित करण्यासाठीही मंजुरी दिली आहे.
     
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या