Home /News /national /

चीनविरोधात लढण्यासाठी वायू सेनेकडे राफेल जेट तर आहे, मात्र प्रशिक्षित पायलट नाहीत?

चीनविरोधात लढण्यासाठी वायू सेनेकडे राफेल जेट तर आहे, मात्र प्रशिक्षित पायलट नाहीत?

काही दिवसांपूर्वी चीनविरोधात लढण्यासाठी फ्रान्सकडून लढाऊ राफेल विमानं खरेदी करण्यात आली आहेत

    नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : भारत आपली वायू सेना (Airforce) मज़बूत करण्यासाठी अनेक प्रकारच्या सुरक्षा उपकरण आणि आधुनिक लढाऊ विमानांची (Modern Fighter Planes) खरेदी करण्यास अजिबात मागे नाही. भारत आणि चीनमध्ये सीमेवरील तणावानंतर (India China Border Tension)  फ्रान्सहून भारतात आलेल्या राफेल विमानांची पहिली (Rafale Jets) खेप याचं उदाहरण आहे. मात्र आता विचार करण्याची गोष्ट आहे की भारतीय वायुसेनेजवळ असं तर नाही की विमानं तर आली मात्र राफेल सारख्या विमानांना चालविण्यासाठी प्रशिक्षित पायलटच  (Fighter Pilots) नाहीत? राफेलची पहिली खेप जी भारतीय वायु सेनाच्या अंबाला एअरबेसवर पोहोचली आहे आणि लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्लीच्या उपस्थितीत एका कार्यक्रमानंतर या विमानांना अधिकृतपणे सैन्यास सहभागी करण्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र यादरम्यान पायलट यांच्या कमीचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. का उपस्थित झाला हा प्रश्न? राफेल जेटव्यतिरिक्त मिग 29 आणि सुखाई 30 विमानांसोबत भारतीय हवाई सैन्य अधिक बळकट होईल. इंडिया टुडेद्वारा फाईल केलेल्या एका आरटीआयच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. गेल्या 10 वर्षात हवाई सैन्यात 798 पायलटांनी राजीनामा दिला आहे. ज्यामध्ये 289 यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. म्हणजे आता हे पायलट खासगी क्षेत्रात सेवा देऊ शकतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या