Home /News /national /

Facebookवरील प्रेमानंतर विवाहित मुलाशी ठेवले संबंध, असं काही झालं की तरुणीने थेट खेचलं कोर्टात

Facebookवरील प्रेमानंतर विवाहित मुलाशी ठेवले संबंध, असं काही झालं की तरुणीने थेट खेचलं कोर्टात

एकदा तुमच्या स्मार्टफोनवर हे स्पायवेअर आलं की तुमच्या क्लाउड अकाउंटमधून संपूर्ण हिस्ट्री डाउनलोड करते. हे स्पायवेअर अवैध असूनही यूजर्सचे अकाउंट हॅक करते.

एकदा तुमच्या स्मार्टफोनवर हे स्पायवेअर आलं की तुमच्या क्लाउड अकाउंटमधून संपूर्ण हिस्ट्री डाउनलोड करते. हे स्पायवेअर अवैध असूनही यूजर्सचे अकाउंट हॅक करते.

उच्च न्यायालयात जेव्हा ही केस दाखल झाली तेव्हा मात्र नेमके प्रकरण समोर आलं

  नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : या दोघांची Facebookवर मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं. मात्र तरुणाने जेव्हा तिच्याशी बोलणं बंद केलं ते काही तरुणीला खपलं नाही. मुलगा आपल्याला दुर्लक्ष करतोय, आपल्याशी बोलत नाही या भावनाने ती चिडली आणि तिने थेट न्यायालयचं गाठलं. या  तरुणीने तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयात जेव्हा ही केस दाखल झाली तेव्हा मात्र नेमके प्रकरण समोर आलं. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. मात्र एका छोट्याशा गोष्टीने तरुणाने तिच्याशी बोलणं बंद केलं. या कारणामुळे दुखावलेल्या तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. न्य़ायालयात मात्र तरुणीने आपण केलेल्या खोट्या आरोपाची कबुली दिली आहे. हे प्रकरण उत्तर वसंत कुंज परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये तरुणीच्या तक्रारीनंतर एका तरुणाविरोधात  बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. हा तरुण मिलेट्री फोर्समध्ये आहे. कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर या तरुणाची रुग्णालयात नर्सचे काम करणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. यावेळी तरुणाने आपण वैवाहिक असल्याची माहिती तरुणीला दिली होती. यावर मुलीने काही हरकत व्यक्त केली नव्हती. यानंतर दोघांनी एकमेकांच्या संमंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या तरुणाची पोस्टिंग दिल्लीच्या बाहेर होती. मात्र तो वेळोवेळी दिल्लीत येत होता. या दरम्यान तो या तरुणीला भेटत होता. डिसेंबर 2019 मध्ये काही कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. यामुळे तरुणाने तरुणीशी बातचीत बंद केली. यावर तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराची FIR दाखल केली. यानंतर तरुणाने सुटकेसाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयात तरुणीने स्पष्टीकरण दिल्यानंतर नेमकं प्रकरण समोर आलं. तरुणीने FIR रद्द करण्याला संमंती दिली आहे. तरुण माझ्याकड़े दुर्लक्ष करीत होता, माझ्य़ाशी बोलत नव्हता म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे स्पष्टीकरण तरुणीने दिलं आहे. अन्य बातम्या

  खवले मांजरांची तस्करी करणारी टोळी अटकेत, किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Delhi crime, Facebook, High court

  पुढील बातम्या