Home /News /national /

आणखी एक आत्महत्या, कोरोनाच्या भीतीने इनकम टॅक्सच्या अतिरिक्त कर संचालकांनी आयुष्य संपवलं

आणखी एक आत्महत्या, कोरोनाच्या भीतीने इनकम टॅक्सच्या अतिरिक्त कर संचालकांनी आयुष्य संपवलं

इनकम टॅक्सच्या अतिरिक्त कर संचालकांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण आयकर विभागाला धक्का बसला आहे.

    नवी दिल्ली, 14 जून : देशात कोरोनाचा हाहाकार माजला असताना अनेक विविध घटनांमुळे देश मोठ्या धक्क्यात आहे. अशात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इनकम टॅक्सच्या अतिरिक्त कर संचालकांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण आयकर विभागाला धक्का बसला आहे. शिवराज सिंह (वय 56) असं आत्महत्या करणाऱ्या कर संचालकांचं नाव आहे. दिल्लीमध्ये द्वारका सेक्टर 6 मध्ये राहत्या घरी स्व:ला गोळी घालत त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्हमत्या करण्याआधी त्यांनी एक सुसाईड नोटदेखील लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं धक्कादायक कारण लिहिलं आहे. कोरोना झाल्याची शंका असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साडेसहा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या