Facebook ते WhatsApp गेल्या 10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड

Facebook ते WhatsApp गेल्या 10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड

भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 60 कोटींच्या आसपास आहे. तर त्यापैकी बहुतांश जणांकडे इंटरनेट आहे. त्यामुळे भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ झाली आहे.

  • Share this:

मुंबई 19 डिसेंबर : सोशल मीडिया आणि इंटनेटमुळे गेल्या 10 वर्षात सगळ्याचं क्षेत्रात प्रचंड प्रमाणात बदल झाला. माध्यम क्षेत्र अमुलाग्र पद्धतीने बदलून गेलं. संपर्काच्या क्षेत्रात तर क्रांतीच झाली. भारत हा जगात सर्वाधिक डेटा वापरणारा देश ठरला. भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 60 कोटींच्या आसपास आहे. तर त्यापैकी बहुतांश जणांकडे इंटरनेट आहे. त्यामुळे भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ झाली आहे. आता तर सोशल मीडियाची एवढी सवय झाली की सवयीचं रुपांतर आता व्यसनात झालंय. लोकांना त्याच्याशीवाय चैनच पडत नाहीये. इंटरनेट वापराचा खर्च हा सर्वसामान्याच्या आवाक्यात आल्याने अगदी गावपातळीवरही त्याचं लोण पसरलंय. 10 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता झापाट्याने पुढे जात असून गेल्या दहा वर्षा सोशल मीडियावर जगभरात जी 10 APPs सर्वाधिक डाऊनलोड झाली त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मोबाईल डेटा आणि सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांच्या वर्तन व्यवहाराचा अभ्यास करणाऱ्या APP ANNIE या वेबसाईटने याबाबतची आकडेवारी दिलीय.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी राष्ट्रवादीची घालमेल, उद्धव ठाकरेंनी दिलं हे उत्तर

Facebook

लोकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेलं APP म्हणजे फेसबुक. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे अशा प्रत्येकाने हे APP डाऊनलोड केलंय. त्यामुळे जगात सर्वाधिक डाऊनलोड केलेलं APP हे फेसबुक ठरलंय. संयुक्त राष्ट्रात बोलताना अनेक नेत्यांनी फेसबुक हे तिसरं जगच असल्याचं म्हटलं होतं.

Facebook Messenger

फेसबुकने मॅसेजिंगसाठी Facebook Messenger तयार केलं. फेसबुकशीच कनेक्ट असल्याने लोकांना त्याची पसंती मिळाली. वापरायला सोपं असल्याने जगभरात त्याचा वापर केला जातो. त्यामुळे हे डाऊनलोड होणारं दुसऱ्या क्रमांचं APP ठरलंय.

What's App

What's Appही फेसबुकनेच खरेदी केलंय. मेसेजिंगसाठी त्याचा वापर केला जातो. What's Appवर आता Vioce Call Video Callची सुविधा आहे. त्याचबरोबर ती मोफत असल्याने SMS या पेड सेवेचं दुकानच बंद झालं. आता सगळा संवाद वॉट्सअॅपच्याच माध्यमातून केला जातो.

Instagram

इन्स्टाग्राम हे तसं सर्वात तरुण APP आहे. पण ते अल्पावधीतच लोकप्रिय झालं. Instagramचा वापर हा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी केला जातो. याचा वापर करणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग तयार झाला असून तरुणांमध्ये हे अॅप लोकप्रिय आहे.

मुंबईतल्या जमीनीवरून भाजपचा शिवसेनेवर गंभीर आरोप, वाद रंगणार!

Snap Chat

Snap Chat हे संवादासाठीचं APP आहे. 2011मध्ये त्याची सुरुवात झाली. याच्या वापरकर्त्यांची संख्याही मोठी असून डाऊनलोडमध्ये ते पाचव्या स्थानावर आहे.

Skype

व्हिडीओ कॉलिंगसाठी याचा वापर खास करून केला जातो. पण वॉट्सअॅपमुळे याची मागणी आता कमी होत असली तरी डाऊनलोडमध्ये ते 6व्या क्रमांकावर आहे.

TikTok

व्हिडीओ शेअरिंगसाठी TikTokचा वापर होतो. चीनचं हे अॅप असून त्याच्या वापरकर्त्यांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण आता एवढं वाढलं आहे की TikTok स्टार्सही तयार झाले असून त्याचे व्हिडीओ अतिशय झपाट्याने व्हायरल होत असतात.

UC Browser

हे एक वेब Browser असून चीनच्या अलीबाबा कंपनीच्या मालकीचं आहे. अतिशय वेगाने त्याचा वापर होत असून Google क्रोमलाही त्याने मागे टाकल्याचं म्हटलं जातंय.

उद्धव ठाकरे भाजपला देणार 'चेकमेट', शनिवारी करणार मोठी घोषणा!

Youtube

Youtube हे व्हिडीओ शेअरींग करण्याचं माध्यम आहे. व्हिडीओ जगासमोर मांडण्यासाठी याचा वापर केला जातो. आज प्रत्येक मिनिटाला काही लाख व्हिडीओ अपलोड होत असतात. मनोरंजन आणि व्यावसायीक प्रमोशनसाठीही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Twitter

जगभरातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांमध्ये हे माध्यम प्रचंड लोकप्रिय ठरलंय. विचार व्यक्त करण्याचं हे माध्यम असून विचारवंत, लेखक, नेते, कलाकार, उद्योगपती ते अगदी सामान्य माणसं याचा वापर करतात. माहिती कळण्याचं आणि जगासमोर पोहोचविण्याचं हे सर्वात मुख्य माध्यम आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 19, 2019, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading