भारतात सक्रिय आहे लंकेतील हल्ल्यामागची ही दहशतवादी संघटना

भारतात सक्रिय आहे लंकेतील हल्ल्यामागची ही दहशतवादी संघटना

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 215 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : श्रीलंकेची राजधानी कोलंबो रविवारी साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली. ईस्टर संडेच्या दिवशी 8 बॉम्बस्फोट घड़वून आणले गेले. यात 215 जणांचा मृत्यू झाला असून 500 लोक जखमी आहेत. या हल्ल्यामागे नॅशनल तौहिद जमात ही दहशतवादी संघटना असल्याचे सांगितले जात आहे. तौहिद जमात ही एक कट्टर मुस्लिम संघटना आहे. भारतातील तामिळनाडु राज्यातही ही संघटना सक्रिय आहे. अद्याप तौदिद जमातने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटामागे आपला हात असल्याचं म्हटलेलं नाही.

श्रीलंकेत बॉम्बस्फोट होण्याच्या 10 दिवस अगोदर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. रविवारी देशभरात आत्मघाती हल्लेखोर प्रमुख चर्चला टार्गेट करू शकतात असं पोलिसांनी म्हटले होते. याला पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही दुजोरा दिला आहे.

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल तौहिद जमातने जहरान हासिम आणि त्याच्या साथिदारांसोबत मिळून हल्ल्याचा कट रचला. त्याची पूर्वतयारी करताना 16 एप्रिलला स्फोटकांसह दुचाकी कतानकुडी इथं ठेवून गेले होते.

कोलंबोसहित देशभरात 8 बॉम्बस्फोट झाले. रविवारी सकाळी 8.45 ला या साखळी बॉम्बस्फोटांची सुरूवात झाली. चर्च आणि हॉटेलला टार्गेट करण्यात आले.

First published: April 22, 2019, 8:18 AM IST

ताज्या बातम्या