नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिर भूमिपूजनाबाबत कर्नाटक भाजपचे महासचिव यांनी एक पेंटिग शेअर केली आहे. ज्यावर काँग्रेस नेता शशी थरूर अत्यंत चिडले आहेत. या पेंटिगमध्ये पंतप्रधान मोदींची उंची भगवान रामाहून मोठी दाखवली आहे.
त्यांनी यावर निशाणा साधल प्रश्न उपस्थित केला आहे. शशी थरूर यांनी ट्विट करुन हा प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांनी म्हटलं आहे की, भाजप नेता राम चरित मानसमधील कोणत्या भागातून स्वत:ला रामापेक्षा मोठं व्हायला शिकवलं आहे. त्यानंतर भाजप नेता शोभा करांदलजे यांनी डॅमेज कंट्रोल करीत एक नवी पेंटिग शेअर केली. ज्यात भगवान राम यांना हत्तीवर आणि मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्यासोबत दाखविण्यात आले.
ना प्रेम सीखा है, ना त्याग सीखा है ना करुणा सीखी है, ना अनुराग सीखा है खुद को राम से बड़ा दिखाकर, खुश होने वालो तुमने श्री राम चरित मानस का कौन सा भाग सीखा है?#AyodhyaRamMandir https://t.co/ijCXms02Ar
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 5, 2020
न प्रेम सीखा, न करुणा....-शशी थरूर
भाजप नेत्याने केलेल्या ट्विटवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी लिहिले की, ना प्रेम सीखा..ना त्याग सीखा है...ना करुणा सीखी है..ना अनुराग सीखा है...स्वत:ला रामाहून मोठं दाखवून आनंदी राहणारे, तुम्ही श्रीराम चरित मानसचा कोणता भाग शिकला आहात?
भाजप नेत्याने लिहिलं होतं...
कर्नाटक भाजपचे महासचिव आणि लोकसभा खासदार शोभा करांदलजे यांनी पेंटिग पोस्ट केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान रामाला त्याच्या मंदिराकडे घेऊन जात असताना दिसत आहेत. पेंटिगमध्ये भगवान राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात पकडून मंदिराकडे जात असल्याचे दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.