ट्रम्प कन्या इव्हांकाने या VIDEO साठी मानले पंतप्रधानांचे आभार

ट्रम्प कन्या इव्हांकाने या VIDEO साठी मानले पंतप्रधानांचे आभार

हा व्हिडीओ मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : देशभरातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. जगभरात प्रत्येक देश कोरोनाशी लढा देत आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून लोक घरात बंदिस्त आहेत. अशा परिस्थितीत मानसिक शांती खूप आवश्यक आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन योग निद्रासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. यावर मोदींनी लिहिले आहे की, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आठवड्यात 1 ते 2 वेळा मी योग निद्राचा अभ्यास करतो. हे शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न ठेवण्यास मदत करतं. याशिवाय तणाव आणि चिंता कमी करतं. इंटरनेटवर तुम्हा योग निद्रा संदर्भातील अनेक व्हिडीओ मिळतील. मी एक हिंदी व इंग्रजीतील व्हिडीओ शेअर करीत आहे. स्वामी निरंजनानंद सरस्वती यांचा हा योग निद्राचा व्हिडीओ आहे.

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योग निद्राचा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले आहेच. यामध्ये त्यांनी #TogetherApart असं हॅशटॅगही वापरलं आहे. इव्हांका जेव्हा भारतात आल्या होत्या तेव्हा त्यांची खूप चर्चा झाली होती.

First published: March 31, 2020, 6:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या