• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटवर बेछूट गोळीबार, ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू

पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटवर बेछूट गोळीबार, ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू

पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटीवर गोळीबार

पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटीवर गोळीबार

Thane Fisherman died after pakistani navy opens fire on boat: पाकिस्तानी नौदलाने केलेल्या गोळीबारात ठाम्यातील मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : पाकिस्तानी नौदलाने (Pakistan Navy) रविवारी भारतीय नौकेवर गोळीबार (firing on Indian fisherman boat) केला. गुजरातच्या किनाऱ्यावर झालेल्या या गोळीबारात एका मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला मच्छीमार हा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Thane Fisherman Shridhar died after Pakistan opens fire on Indian fisherman boat) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुजरातमधील द्वारका येथे 'जलपरी' नावाच्या बोटीवर पाकिस्तानी नौदलाने गोळीबार केला. या गोळीबारात श्रीधर चामडे (Shridhar Chamade) नावाच्या मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक मच्छीमार जखमी झाला आहे. जखमी झालेल्या मच्छीमाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मच्छीमार हा उत्तरप्रदेशचा निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पाकिस्तानी नौदलाने भारतीय मच्छीमारांच्या 'जलपरी' बोटवर गोळीबार केला त्यावेळी जलपरी बोटीवर एकूण 8 मच्छीमार होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी पाकिस्तानी नौदलाने गोळीबार केला तेव्हा जलपरी ही बोट सीमेवर होती. अचानक झालेल्या या गोळीबाराने एकच खळबळ उडाली आणि मच्छीमारही गोंधळात पडले होते. वाचा : गुजरातमध्ये अग्नितांडव; पोलीस स्टेशन परिसरात रात्री भीषण आग, 25 गाड्या जळून खाक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समुद्री सीमेबाबत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या बोटींना भारताची हद्द कुठे संपते आणि पाकिस्तानची कुठे सुरू होते, याची नेमकी कल्पना येत नाही. आपल्या देशाच्या हद्दीत घुसखोरी झाल्याचा दावा करत पाकिस्तानकडून भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आला. यात श्रीधर नावाच्या मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून यापूर्वीही भारतीय मच्छीमारांवर अटक करण्याची किंवा बोट जप्त करण्याच्या घटना घडल्या आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने 11 भारतीय मच्छीमारांना अटक केली होती आणि त्यांच्या दोन बोटी जप्त केल्या होत्या. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने 11 भारतीय मच्छीमारांना अटक केली होती आणि त्यांच्या दोन बोटी जप्त केल्या होत्या. तर फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने 17 भारतीय मच्छीमारांना जलक्षेत्रात कथितपणे प्रवेश केल्याच्या आऱोपाखाली अटक केली होती आणि त्यांच्या तीन बोट ताब्यात घेतल्या होत्या. यापूर्वी श्रीलंकेनं 23 मच्छीमारांना अटक केली होती. आपल्या हद्दीत बेकायदेशीररित्या घुसखोरी केल्याचा आरोप ठेवत त्यांच्या नौकादेखील जप्त करण्यात आल्या होत्या. तर त्यापूर्वी मार्च महिन्यातही श्रीलंकेनं 54 भारतीय नागरिकांना अटक केली होती.
  Published by:Sunil Desale
  First published: