Home /News /national /

Valley of Death मध्ये 26 मार्चपासून मुंबईचा ट्रेकर बेपत्ता, याचठिकाणी 11 परदेशी झाले होते गायब

Valley of Death मध्ये 26 मार्चपासून मुंबईचा ट्रेकर बेपत्ता, याचठिकाणी 11 परदेशी झाले होते गायब

File Photo Courtesy @thrillophilia

File Photo Courtesy @thrillophilia

कुल्लू जिल्ह्यातील पार्वती खोऱ्यात ट्रेकिंगसाठी गेलेला एक 22 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेला तरुण महाराष्ट्रातील ठाणे शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली, 11 एप्रिल : गेल्या काही वर्षांपासून ट्रेकिंगला (Trekking) जाण्याचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. विशेषत: तरुणांमध्ये (Youth) ट्रेकिंगला जाण्याचं प्रमाण जास्त आहे. जगभरातील लाखो तरुण विविध ठिकाणी ट्रेकिंग कॅम्प (Trekking Camp) आयोजित करत असतात. काही जण ग्रुपमध्ये ट्रेकिंगला (Group Trekking) जातात तर काहींना सोलो ट्रेकिंग (Solo Trekking) करण्याचीदेखील आवड असते. मात्र, ट्रेकिंगचा ही आवड कधी-कधी जीवघेणी ठरते. ट्रेकिंगला गेल्यानंतर अपघात (Accident) झाल्याचा किंवा रस्ता चुकल्याच्या अनेक घटना घडल्याचं कानावर पडत असतं. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) कुल्लू (Kullu) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कुल्लू जिल्ह्यातील पार्वती खोऱ्यात (Parvati Valley) ट्रेकिंगसाठी गेलेला एक 22 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता (Missing) झालेला तरुण महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (Thane) शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, अद्याप त्याचा काहीही तपास लागलेला नाही. द ट्रिब्युननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यातील पार्वती खोरं पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. नुकताच या ठिकाणी ठाणे येथील विजय मसारी जडेजा नावाचा तरुण बेपत्ता झाला आहे. विजय आपल्या तीन मित्रांसह 26 मार्च रोजी कुल्लूतील कसोल (Kasol) इथे आला होता. ते सर्वजण एका हॉटेलमध्ये थांबले होते. 31 मार्च 2022 रोजी ते खीर गंगा (Kheer Ganga) येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी खीर गंगावरून परतताना विजय रस्ता चुकला, तर त्याचे तीन साथीदार मणिकरण (Manikaran) येथे सुखरूप परतले. विजय परत न आल्यानं त्याच्या मित्रांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी विजयचा शोध सुरू केला आहे. द ट्रिब्यूनशी बोलताना कुल्लूचे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) गुरदेव चंद शर्मा म्हणाले, 'आतापर्यंत बेपत्ता ट्रेकरबद्दल कोणताही सुगावा लागला नव्हता. मात्र, आता एका खंदकाजवळ (Trench) त्याचं जॅकेट सापडलं आहे. त्याच्याआधारे पोलीस पथकांनी शोध कार्य सुरू ठेवलं आहे. बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.' पुढे ते असंही म्हणाले, ‘कुल्लू जिल्ह्यात येणार्‍या ट्रेकर्सनी ट्रेकिंगला जाण्यापूर्वी जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे. जेणेकरुन गरज पडल्यास पोलीस त्यांना मदत करू शकतील.’

हे वाचा - ब्रिटिशकालीन 100 वर्ष जुना पूल तुटला, 138 चाकी ट्रॉलीचा भीषण अपघात

1991 पासून कुल्लू जिल्ह्यातून आतापर्यंत 19 परदेशी नागरिक (Foreign Tourist) बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी बहुतेकजण पार्वती खोऱ्यात बेपत्ता झाले आहेत. ऑगस्ट 1991 मध्ये ऑडेट व्हिक्टोरिया ही ऑस्ट्रेलियन महिला मणिकरणमध्ये बेपत्ता झाल्याची पहिली घटना घडली होती. अलीकडच्या काळात, 21 ऑगस्ट 2016 रोजी जस्टिन अलेक्झांडर शेटलर (Justin Alexander Shetler) हा अमेरिकन ट्रेकरदेखील याच ठिकाणी बेपत्ता झाला होता. पोलिसांनी त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण यश आलं नाही. गेल्या बुधवारी (6 एप्रिल 2022 ) मणिकरण-खीर गंगा मार्गावर दिल्लीतील एका ट्रेकरचा मृतदेह सापडला. ही मुलगी गेल्यावर्षी (2021) 8 नोव्हेंबरला कसोल येथे आली होती आणि दुसऱ्या दिवशी खीर गंगाला निघाली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. सध्या कुल्लू पोलीस महाराष्ट्रातील बेपत्ता ट्रेकरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
First published:

Tags: Himachal pradesh, Mumbai, Thane

पुढील बातम्या