टेस्लाची इलेक्ट्रिक कार भारतात, किंमत 1 कोटी रुपये

टेस्लाची इलेक्ट्रिक कार भारतात, किंमत 1 कोटी रुपये

एकदा चार्ज केली की ही गाडी ४३५ किलोमीटर धावू शकते.

  • Share this:

31 जानेवारी : टेस्ला या विख्यात इलेक्ट्रिक कार कंपनीची गाडी पहिल्यांदाच भारतात दाखल झालीये. गाडीची मूळ किंमत ५५ लाख आहे, पण ड्युटी लागल्यावर तिची किंमत १ कोटीपर्यंत जाते. एकदा चार्ज केली की ही गाडी ४३५ किलोमीटर धावू शकते.

सध्या जगात इलेक्ट्रिक कार्सची संख्या कमी असली, तरी इलेक्ट्रिक कार्स ही ऑटोमोबाईल क्षेत्राचं भविष्य मानलं जातं, कारण अनेक देशांनी येत्या १० ते १५ वर्षांत फक्त इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यावर राहतील, असं घोरण आखलंय.

कशी आहे इलेक्ट्रिक कार ?  

- फक्त विजेवर चालते

- सीएनजी कारप्रमाणं पेट्रोलचा पर्याय नाही

- इलेक्ट्रिकच्या एकूण 2 मोटर

- फोन चार्ज करतो तशी चार्ज करावी लागते

- एकदा चार्ज केल्यावर 435 किमीची क्षमता

- मॉडेलचा प्रकार - क्रॉसओव्हर

- किंमत - 1 कोटी (ड्युटीसकट)

- फक्त इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला जगातली एकमेव कंपनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading