दहशतवादी आणखी 'मोठ्या हल्ल्या'च्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

दहशतवादी आणखी 'मोठ्या हल्ल्या'च्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

जैश - ए - मोहम्मद आणखी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

  • Share this:

दिल्ली, 21 फेब्रुवारी : पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केल्यानंतर आता दहशतवादी पुन्हा एकदा भारतीय सैन्याला लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये आहे. जैश - ए - मोहम्मह ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. दहशतवाद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी जैश - ए - मोहम्मद पुलवामा हल्ल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्याच्या तयारीत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जैश - ए - मोहम्मदनं 500 किलो स्फोटकं या हल्ल्यासाठी तयार ठेवली आहेत. शिवाय, आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरली जाणारी गाडी देखील तयार ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू - काश्मीर किंवा बाहेर देखील हा हल्ला केला जाऊ शकतो. या संभाव्य हल्ल्याबद्दल लष्कराला सतर्क करण्यात आलं आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

आयएसआयची मदत

पुलवामा हल्ला करण्यामागे आयएसआय पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनं दहशतवाद्यांना मदत केली होती. त्यामुळे पुलवामा येथे हल्ला झाला होता. सध्या एनआयए या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे.

पुलवामात आत्मघातकी हल्ला

300 किलो स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या गाडीवर आदळून 14 फेब्रुवारी रोजी जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये 40 जवान शहीद झाले. आदिल दर दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळली होती. दरम्यान, जैश - ए - मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

भारताचा पाकला इशारा

दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा सरळ इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना दिली आहे. शिवाय, पाकिस्तानविरोधात देखील आता भारतानं कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. भारतानं पाकिस्तानच्या मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. तसेच पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावण्यात आले आहे.


VIDEO: किसान सभेच्या 'लाल वादळा'नं मुंबईच्या दिशेनं केली कूच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या