Home /News /national /

Nagrota Encounter : मोदींच्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट! 9/11 पूर्वीच अतिरेक्यांचा उद्देश झाला उघड

Nagrota Encounter : मोदींच्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट! 9/11 पूर्वीच अतिरेक्यांचा उद्देश झाला उघड

नगरोटा (Nagrota incidence) इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हे 4 अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता. 9/11 ची पुनरावृत्ती टाळण्यात Border Grid ला यश आलं.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : जम्मू काश्मीरमध्ये  (Jammu-Kashmir) नगरोटा (Nagrota Encounter) इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या घटनेचं वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालं. पण नगरोटा (Nagrota incidence) इथे मारले गेलेले दहशतवादी काही ठराविक उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते, याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगरोटाची घटना बॉर्डर ग्रीड रणनीचं (Border Grid) यश मानलं जात आहे. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरोटा घटनेनंतर त्याबद्दल सविस्तर चर्चा आणि विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातल्या सुरक्षा यंत्रणेतले महत्त्वाचे गुप्तचर, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा  (NSA) आणि गृहमंत्री (HM), परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अतिरेकी सीमेपलीकडून भारतावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने आले होते. 26/11 च्याच दिवशी पुन्हा एकदा तशीच खळबळ उडवून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे तो उद्ध्वस्त झाला. जम्मू-काश्मीरच्या नगरोटा भागात गुरुवारी (19 नोव्हेंबर) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू झाली. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नगरोटा इथल्या बन परिसरातील टोल प्लाझाजवळ सुरक्षा यंत्रणांनी एका संशयास्पद ट्रकला गाठलं.  पहाटे पाच वाजता हा ट्रक अडवल्यानंतर आत लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरुवात झाल्याची झाली. दहशतवादी असल्याची खातरजमा झाल्यावर सुरक्षा दलांनी हा ट्रक उडवून दिला. या घटनेत ठार झालेले 4 दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असत्याचं स्पष्ट झालं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी मोठा कट तयार करत होता. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलानं तातडीनं कारवाई करत या अतिरेक्यांना गाठलं आणि कंठस्नान घातलं. Border Grid ंमध्ये सहभागी लष्कर (Indian Army), सीमा सुरक्षा दल (BSF) आणि जम्मू काश्मीर पोलिस (J&K Police) या तिन्ही सुरक्षा दलांच्या एकत्रित सतर्कतेमुळे आणि गुप्तचरांच्या जाळ्यामुळे जैशच्या अतिरेक्यांचा पत्ता लागू शकला आणि मोठ्या हल्ल्यापासून देशाचं रक्षण झालं. नगरोट घटनेनंतर लष्कर प्रमुख एमएम नरवणे (MM Naravane) यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवत आहे. मात्र असे दहशतवादी वाचणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं असं लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे. नगरोटा कारवाईसाठी त्यांनी सुरक्षा दलांचं अभिनंदनही केलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist

    पुढील बातम्या