S M L

जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या लुटल्या 5 रायफल्स

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2017 02:56 PM IST

जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या लुटल्या 5 रायफल्स

03 मे : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच आहे. शोपियामध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करत त्यांच्याकडील 5 रायफल्स लुटल्या आहेत.

काल मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कोर्ट परिसरात पोलीस पोस्टवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून 5 रायफल्या लुटल्या.

सर्व दहशतवादी लष्काराच्या वर्दीत आले होते. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही अडथळ्याशिवय त्यांना चौकीपर्यंत येण्यास मज्जाव केला नाही. पण लष्कराच्या वर्दीत दहशतवादी असल्याचे समजण्याआधीच अतिरेक्यांनी पोलिसांना घेरले आहे.दरम्यान, ज्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांच्या रायफल दहशतवादी घेऊन फरार झालेत, त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2017 02:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close