काश्मीरमध्ये भारतीय सेनेला मोठे यश; 'लष्कर'चा कमांडर अबू दुजानाचा खात्मा

काश्मीरमध्ये भारतीय सेनेला मोठे यश; 'लष्कर'चा कमांडर अबू दुजानाचा खात्मा

अबू दुजानाला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे.

  • Share this:

श्रीनगर,1 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून पुलवामामध्ये दहशतवादी आणि भारतीय सेनेमध्ये चाललेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू दुजाना ठार झाला आहे. 7 वर्षांपासून फरार असलेल्या अबु दुजानावर 10 लाखांचे बक्षीस होतं. अबू दुजानाला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पुलवामामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी आणि भारतीय सेनेमध्ये चकमक सुरू होती. आज सकाळी चारच्या सुमारास भारतीय सेनेने दहशवाद्यांना चहुबाजूंनी घेरले आणि त्यानंतर एन्काउन्टरमध्ये अबु दुजानाचा खात्मा करण्यात आला. या एनकाउन्टरची माहिती डीजीपी वैद्य यांनी दिली आहे. ज्या घरात हे एन्काउन्टर करण्यात आले त्या घरात अबू दुजाना आणि त्याचा सहकारी आरिफ ललहारी उपस्थित होता. सध्यातरी अबू दुजानाच्या बॉडीचा शोध चालू आहे. या एन्काउन्टकरनंतर पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पुलवामामधील हे सर्च ऑपरेशन चालूच राहणार असून लपून राहिलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

(न्यूज 18)

First published: August 1, 2017, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading