श्रीनगर 21 मे: सर्व देश कोरोनाशी युद्ध लढत असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारला दोन युद्ध करावं लागत आहे. एक कोरोनाशी आणि दुसरं अतिरेक्यांशी. गंधारबल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलांच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. यात BSFचे 2 जवान शहीद झाले. जीयाउल हक आणि राणा मंडल या वीर जवानांचा समावेश आहे.
लपून आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार केला. त्यात हे दोनही जवान शहीद झाले. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले करत आहेत. काही दिवसांपूर्वी हंदवाडा इथं झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले होते. त्यात एका अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमध्ये दोन वर्षांनंतर रात्री उशिरा सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कानेमजार नवाकदल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चमकम झाली. या चकमकीनंतर श्रीनगरमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद कऱण्यात आली आहे. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळून दहशतवाद्यांविरोधी केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्य दलानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.
या चकमकीत हिजबुलचा एक कमांडर आणि दोन दहशतवादी ठार झाले होते. काही काही तास उलटून गेल्यानंतर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.