मराठी बातम्या /बातम्या /देश /

घुसखोरी करणारे दहशतवादी वाचणार नाहीत, लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

घुसखोरी करणारे दहशतवादी वाचणार नाहीत, लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

New Delhi: Chief of Army Staff Gen M M Naravane after the annual press conference in New Delhi, Saturday, Jan. 11, 2020. (PTI Photo/Atul Yadav)(PTI1_11_2020_000049B)

New Delhi: Chief of Army Staff Gen M M Naravane after the annual press conference in New Delhi, Saturday, Jan. 11, 2020. (PTI Photo/Atul Yadav)(PTI1_11_2020_000049B)

'सुरक्षा दलांची ही कारवाई म्हणजे दहशतवादी आणि त्यांचं पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला इशारा आहे. दहशतवाद्यांना सोडणार नाही.'

  • Published by:  Ajay Kautikwar
वी दिल्ली 19 नोव्हेंबर: जम्मू-कश्मीरच्या (Jammu-Kashmir)  नगरोटा (Nagrota Encounter)  इथं सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतर लष्कर प्रमुख एमएम नरवणे (MM Naravane) यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवत आहे. मात्र असे दहशतवादी वाचणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं असं लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे. नगरोटा कारवाईसाठी त्यांनी सुरक्षा दलांचं अभिनंदनही केलं. सुरक्षा दलांची ही कारवाई म्हणजे दहशतवादी आणि त्यांचं पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला इशारा आहे. सुरक्षा दलांनी आता धडक कारवाई केली असू भारतात घुसखोरी करून दहशत माजविणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. जम्मू-कश्मीर च्या काकापोरा भागात बुधवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ (CRPF) आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात 12 नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि ग्रेनेडचा स्फोट हा रस्त्यावरच झाला. त्यामुळे हे नागरिक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. सोमवारीही दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला केला होता. मात्र त्यात कुणीही जखमी झालेलं नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करतो आहे. 15 नोव्हेंबरला पाकिस्तानकडून (Pakistani Army) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यात मोठी जीवितहानी झाली होती. जम्मू-काश्मीरच्या गुरेज आणि उरी सेक्टरदरम्यान, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, ज्यात पाच सुरक्षा रक्षकांसह 11 लोकांचा मृत्यू झाला होता.
First published:

Tags: Indian army

पुढील बातम्या