पाकिस्तानातली अण्वस्त्र पळवून दहशतवादी भारतावर हल्ला करण्याची शक्यता, अमेरिकेचा इशारा

पाकिस्तानातली अण्वस्त्र पळवून दहशतवादी भारतावर हल्ला करण्याची शक्यता, अमेरिकेचा इशारा

अतिरेकी पाकिस्तानातली अण्वस्त्रं पळवून हा हल्ला करतील, ही बातमी दिलीय अमेरिकेतल्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी डॅनियस कोट्स यांनी. ते म्हणाले, ' इस्लामाबाद दहशतवाद्यांना संपवण्यात अपयशी ठरलंय.'

  • Share this:

12 मे : पाकिस्तानातली दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानावर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. अतिरेकी पाकिस्तानातली अण्वस्त्रं पळवून हा हल्ला करतील, ही बातमी दिलीय अमेरिकेतल्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी डॅनियस कोट्स यांनी. ते म्हणाले, ' इस्लामाबाद दहशतवाद्यांना संपवण्यात अपयशी ठरलंय.'

पाकिस्तानी अण्वस्त्रांवर दहशतवाद्यांची नजर आहे. अमेरिकेच्या सिनेट इंटेलिजंस कमिटीनं हा इशारा दिलाय. तहरिक-ए-पाकिस्तान,आयएसआयएस यांसारख्या दहशतवादी संघटनांचं अण्वस्त्रांकडे लक्ष आहे.

ट्रंप सरकारने भारत-पाकिस्तानाच्या बिघडत्या संबंधांसाठी पाकिस्तानाला दोषी ठरवलंय. आणि सीमेवर या वर्षी मोठा हल्ला झाला तर हे संबंध आणखी बिघडतील असा इशाराही दिलाय.

डॅनियल कोट्सनी म्हटलंय, ' भारताविरोधात दहशतवाद्यांना मिळणारी मदत थांबवण्यात पाकिस्तान अयशस्वी झालाय.'

First Published: May 12, 2017 01:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading