दहशतवादी ते लष्करी अधिकारी; 'रोल मॉडेल' नझीर अहमद वाणीचा थरारक प्रवास

दहशतवादी ते लष्करी अधिकारी; 'रोल मॉडेल' नझीर अहमद वाणीचा थरारक प्रवास

काश्मीरमधील तरूण दहशतवादाकडे वळत असताना नझीर अहमद वाणी मात्र त्यांच्यासाठी आदर्श ठरतील यामद्ये शंका नाही.

  • Share this:

जम्मू, 15 फेब्रुवारी  : दहशतवादी आदिल मोहम्मद डार यानं पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणला. आदिल हा स्थानिक तरुण आहे. काश्मिरमधले तरुण दहशतवादाकडे वळत असल्याचं बोललं जात असताना नझीर अहमद वाणी यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, याच नझीर वाणी यांनी दहशतवादाला रामराम करत भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय, शोपियन येथे दहशतवाद्यांचा खात्मा देखील केला होता.

दहशतवादी ते लष्करी अधिकारी

काश्मीरमधील कुलग्रामच्या अश्मूजी गावाचे रहिवासी असलेले नझीर वाणी एकेकाळी स्वत: दहशतवादी होते. होय, तुम्हाला वाचून धक्का बसेल. एकेकाळी दहशतवादी असलेल्या वाणी यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले. वाणी यांच्या सारख्या युवकांना काश्मीरमध्ये 'इख्वान' हा शब्द वापरला जातो. वाणी यांनी बंदुक हातात घेऊन बदला घेण्याचे ठरवले होते. पण काही काळातच त्यांना आपण चुकीच्या मार्गावर असल्याचे लक्षात आले. त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडला आणि भारतीय लष्करात सहभागी झाले.

नझीर अहमद वाणी यांना वीरमरण

23 नोव्हेंबर 2018 रोजी 34 राष्ट्रीय रायफल्समध्ये ड्यूटी करणाऱ्या वाणी यांना गु्प्तचर विभागाकडून शोपियांमधील बटागुड गावात 6 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याचे सांगण्यात आले होते. वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दहशतवादी ज्या मार्गाने पळ काढतील तो रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दहशवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना चकमक झाली. या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले. त्यातील दोघांचा खात्मा स्वत: वाणी यांनी केला. मात्र, या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. 26 नोव्हेंबर रोजी वाणी यांच्यावर त्यांचा गावी अंत्यसंस्कार करण्याआधी 21 तोफांची सलामी देण्यात आली. लष्करात दाखल झाल्यानंतर वाणी यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना दोन वेळा सेना मेडल मिळाले होते. यावरून त्यांच्या कामगिरीचा अंदाज येतो.

अशोक चक्रानं सन्मानित

वाणी यांच्या कामगिरीची दखल घेत सरकारनं त्यांचा मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार देऊन 26 जानेवारी रोजी गौरव केला. भारतात शांततेच्या काळात दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. अशोक चक्रानंतर क्रीर्ती चक्र आणि शौर्य चक्राचा असा क्रम लागतो. या वर्षी वाणी यांच्यासह चार अधिकारी आणि जवानांना कीर्ती चक्र आणि 12 जणांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले होते.

VIDEO : दहशतवादी आदिल मोहम्मद डार याचा घाटकोपरवासियांनी जाळला पुतळा

First published: February 15, 2019, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading