दहशतवादी संघटना ‘सिमी’वर आणखी पाच वर्षांसाठी बंदी

दहशतवादी संघटना ‘सिमी’वर आणखी पाच वर्षांसाठी बंदी

या बंदीचा कालावधी 31 जानेवारी 2018 रोजी संपला होता

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

मुंबई, 01 फेब्रुवारी : ‘स्टुंडट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेवर आणखी 5 वर्षांसाठी आणखी कायम बंदी ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2014 रोजी बेकायदा कृती प्रतिबंधक अधिनियमाखाली पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

या बंदीचा कालावधी 31 जानेवारी 2018 रोजी संपला होता. ही बंदी उठवण्यात यावी आणि तिचा कालावधी वाढवावा, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांकडून मत मागवले होते. त्यानुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सिमीवर बंदी टाकावी, असं मत नोंदवलं होतं.

राज्यांनी नोंदवलेल्या मताच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयानं सिमीवर आणखी पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सिमीविरोधात देभशभरात दाखल झालेल्या 58 नवीन गुन्ह्यांचा उल्लेख या निर्णयात करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील जळगाव हे शहर सिमीचे प्रमुख केंद्र होते.

एप्रिल 2016 मध्ये मालेगावात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 8 आरोपींची मुंबईतील विशेष कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील 9 आरोपींची सुटका केली, मात्र त्यापैकी 1 आरोपीचा मृत्यू झाला असून बाकीचे फरार आहेत. हे सर्व 'सिमी'शी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं.

=================================

First published: February 1, 2019, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading