मराठी बातम्या /बातम्या /देश /भारताला धोका, POK मधून दहशतवादी भरती; पाकिस्तानमध्ये ISI च्या गुप्त बैठका

भारताला धोका, POK मधून दहशतवादी भरती; पाकिस्तानमध्ये ISI च्या गुप्त बैठका

भारताची (India)चिंता वाढवणारी एक बातमी समोर येतेय.  हिवाळा आणि बर्फवृष्टीच्या काळातही सीमेपलीकडून (Cross Border Terrorism) दहशतवाद्यांचं कारस्थान सुरूच आहे.

भारताची (India)चिंता वाढवणारी एक बातमी समोर येतेय. हिवाळा आणि बर्फवृष्टीच्या काळातही सीमेपलीकडून (Cross Border Terrorism) दहशतवाद्यांचं कारस्थान सुरूच आहे.

भारताची (India)चिंता वाढवणारी एक बातमी समोर येतेय. हिवाळा आणि बर्फवृष्टीच्या काळातही सीमेपलीकडून (Cross Border Terrorism) दहशतवाद्यांचं कारस्थान सुरूच आहे.

श्रीनगर, 20 डिसेंबर: भारताची (India)चिंता वाढवणारी एक बातमी समोर येतेय. हिवाळा आणि बर्फवृष्टीच्या काळातही सीमेपलीकडून (Cross Border Terrorism) दहशतवाद्यांचं कारस्थान सुरूच आहे. पाकिस्ताननं (Pakistan) आता काश्मीर खोऱ्यानंतर (Kashmir Valley)पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर म्हणजेच पीओकेमधील (POK) तरुणांचा दहशतवादी संघटनांमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न करत आहे. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानकडून हे प्रयत्न जोरात सुरू झाले आहेत.

यासाठी पाकिस्तान देशाची राजधानी इस्लामाबादमध्ये गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी संघटना यांच्यात बैठक सुरू आहेत. दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था भरती योजना आखत आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा-  दारुड्या पित्यानं 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत, धक्कादायक कारण आलं समोर

संघटनांमध्ये अधिकाधिक नवीन भरती आणि त्यांचे प्रशिक्षण याबाबत चर्चा झाल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातून समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये हिज्बुल कमांडर सय्यद सलाहुद्दीन आणि आयएसआय अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. यामध्ये काश्मीर आणि पीओकेमधील संघटनांमध्ये तरुणांना सहभागी करून घेण्यावर अधिक भर देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिज्बुलच्या वाहिद उल्लाह नावाच्या कमांडरला भरतीची जबाबदारी देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या शूर दलाचा प्रमुख तय्यब फारुकी देखील मोठ्या संख्येने भरती करण्यासाठी पीओकेमध्ये सक्रिय झाला आहे.

एलओसीजवळ दहशतवाद्याकडून रेकी

रिपोर्टनुसार, हे दहशतवादी पठाणकोट परिसरात सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. यासोबतच नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. अहवालानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या प्रत्येक फॉरवर्ड डिफेन्स लोकेशनवर 8 ते 10 SSG कमांड्स तैनात करण्यात आले आहेत. ही फॉरवर्ड डिफेन्स लोकेशन्स माछिल, केरन, तंगधर आणि नौगाम सेक्टरमध्ये आहेत.

हेही वाचा- IND vs SA: 'बॉक्सिंग डे' टेस्टसाठी 'क्रिकेट दक्षिण आफ्रिके'चा मोठा निर्णय! 

पाकिस्तानी लष्कराच्या कपड्यांमधील एसएसजी कमांडोसह तेजियान, धुंडियाल, जुरा आणि लिपा फॉरवर्ड डिफेन्स लोकेशन्सवर उपस्थित दहशतवादी नियंत्रण रेषेवर रेकी करत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. घुसखोरीचा प्रयत्न करण्यासाठी आणि BAT कारवाई करण्यासाठी दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ जात आहेत.

First published:

Tags: Pakistan