BIG NEWS: दिल्लीला बॉम्बस्फोटांनी हादरविण्याचा डाव, दहशतवाद्याच्या घरात सापडला स्फोटकांचा साठा

BIG NEWS: दिल्लीला बॉम्बस्फोटांनी हादरविण्याचा डाव, दहशतवाद्याच्या घरात सापडला स्फोटकांचा साठा

पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गन पावडरही जप्त केली. शेकडो लोकांचा बळी घेण्याची क्षमता या गन पावडरमध्ये आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 23 ऑगस्ट: राजधानी दिल्लील्या धौलाकुआं भागातून अटक केलेल्या आयएसआयएस (ISIS) च्या दहशतवादाच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला आहे. या स्फोटकांचा वापर करून दिल्लीला दाहरविण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)  अबू यूसुफ (Abu Yusuf) उर्फ मुस्तकीम याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे घातले त्यात हा शस्त्रसाठा सापडला आहे.

दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करत असून त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येत आहेत.

पोलिसांनी धाडी टाकून जेव्हा हा साठ जप्त केला तेव्हा त्यांना ही धक्कादायक गोष्टी समजली. दिल्लीत एकाच वेळी दोन स्फोट घडविण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने दोन प्रेशर कुकरही आणलेले होते. त्यात 5 किलो स्फोटकं भरून त्याचा बॉम्ब करण्यात आला होत. त्याला टायमरही लावण्यात आले होते. त्यामुळे हा कट मोठा होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दहशतवाद्यांनी देशभर आपले स्लिपर्स सेल तयार केले आहेत. त्यांना फक्त दिल्लीतच बॉम्ब स्फोट घडवायचे नव्हते तर सर्व देशभर स्फोट घडविण्याची त्यांची योजना होती अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गन पावडरही जप्त केली. शेकडो लोकांचा बळी घेण्याची क्षमता या गन पावडरमध्ये आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीत स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याच अतिरेक्यांचा डाव असल्याचा अलर्ट पोलिसांनी दिला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 23, 2020, 5:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या