मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वातंत्र्य दिनाच्या आधी दहशतवाद्यांचा कट उधळला, पुलवामामध्ये IED स्फोटाचा LIVE VIDEO

स्वातंत्र्य दिनाच्या आधी दहशतवाद्यांचा कट उधळला, पुलवामामध्ये IED स्फोटाचा LIVE VIDEO

पुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे

पुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे

पुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे

  • Published by:  sachin Salve
श्रीनगर, 10 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. पण जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने पुलवामामध्ये (Pulwama) सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) जप्त केले आहे. त्यामुळे मोठा हल्ला टळला आहे. जवानांनी IED निकामी केले आहे. पुलावामामध्ये सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचे IED जप्त करण्यात आले आहे. आईडी सापडल्यानंतर उधमपूर-कटरा रेल्वे लिंक आणि उधमपूर रेल्वे स्टेशनवर सुरक्षा कडक करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या आधी देशभरात खबरदारी घेतली आहे. अशातच ही घटना समोर आली आहे. पुलवामामध्ये या घटनेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विशेष श्वान पथक, रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. तसंच, काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), विजय कुमार यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. दरम्यान, बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. 2022 मध्ये काश्मिरी पंडित शासकीय कर्मचारी असलेल्या राहुल भट यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या लतीफ रादरसह 3 लष्कर-ए-तोयबा (एलईटी)च्या ठिकाणा लागला आहे. या चकमकीमध्ये जवानांनी घेराव घातला आहे. या प्रकरणाची कारवाई सुरू आहे.
First published:

पुढील बातम्या