नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)मध्ये भारतीय सैन्य दलाने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता दिल्लीत एका दहशतवाद्याला अटक (Pakistani nationality terrorist arrested in Delhi) करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-47 आणि हँड ग्रेनेड तसेच इतरही शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक कऱण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद अशरफ हा पाकिस्तानातील पंजाबमधील नरोवल जिल्ह्यात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.
Relevant provisions of Unlawful Activities (Prevention) Act, Explosive Act, Arms Act & other provisions being invoked against the man, identified as Mohd Asraf, a resident of Pakistan's Punjab. A search has been conducted at his present address at Ramesh Park, Laxmi Nagar, Delhi.
— ANI (@ANI) October 12, 2021
बनावट ओळपत्राच्या आधारे वावर
दहशतवादी मोहम्मद अशरफ हा बनावट ओळखपत्राच्या आधारे भारतीय नागरिक बनून राहत होता. यासाठी त्याने मोहम्मद नुरी नावाचं आपलं बनावट ओळखपत्रही तयार केलं होतं. दिल्लीतील शास्त्री नगर येथील एका घरात तो काम करत होता. भारतीय आयकार्ड बनवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी भारतात एका मोठा घातपात करण्याची योजना आखत होता. त्यासाठी त्याने विशेष ट्रेनिंग सुद्धा घेतली होती.
मोठा शस्त्रसाठा जप्त
अटक कऱण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये एके-47 रायफल, काडतुसे, एक हँड ग्रेनेड, 2 पिस्तूल आणि 50 काडतुसे जप्त कऱण्यात आली आहेत. तसेच त्याच्याकडून एक बनावट पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्याला अटक करुन सणासुदीच्या काळात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा घातपाताचा कट उधळला आहे.
24 तासांत भारतीय सैन्याने घेतला बदला, 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)मधील पुंछ सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोमवारी भारतीय जवान शहीद झाले होते. या जवानांच्या बलिदानानंतर आता भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
पुंछ नंतर शोपियान येथील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.