दहशतवाद्यांनी ईदच्या दिवशीच केली जवानाची हत्या

दहशतवाद्यांनी ईदच्या दिवशीच केली जवानाची हत्या

Terrorsit Attack on Indian Solder : ईदनिमित्त घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.

  • Share this:

अनंतनाग, 07 जून : जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनंतनागमध्ये ईदसाठी घरी आलेल्या लष्कराच्या जवानाची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यानंतर आता दहशतवाद्यांकरता शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. ईदनिमित्त अहमद बेग हे आपल्या सडुरा गावी आले होते. त्यानंतर संध्याकाळी दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबानं त्यांना रूग्णालयात हलवलं. पण, दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अहमद बेग हे शोपियनमध्ये राष्ट्रीय रायफल पथकात तैनात होते. दहशतवाद्यांच्या या कृत्यानं दहशतवाद्यांविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

‘गडकरी हरणार’ ऑडिओ क्लिप व्हायरल; BJPचे 2 नेते सहा वर्षासाठी निलंबित

औरंगजेबची देखील हत्या

यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी पोलिस आणि पत्रकारांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली आहे. ईदनिमित्त औरंगजेब हा जवान देखील घरी येत होता. त्यावेळी त्याचं अपहरण करत दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी तयार केलेली त्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यामध्ये दहशतवादी औरंगजेबला भारतीय सैन्याबद्दल माहिती विचारत होते. पण, औरंगजेबनं त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्यांनी औरंगजेबची हत्या केली होती.

भाजपच्या वाटेवरील विखेंचं काँग्रेसला खुलं आव्हान

तरूणांचा सैन्याकडे ओढा

जम्मू – काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. पण, स्थानिक तरूणांचं सैन्यात भरती होण्याचं प्रमाण देखील लक्षणीय आहे. दहशतवादी लपून कारवाया करत असले तरी भारतीय जवानांकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा हा भारतीय लष्करानं केला आहे. सरकारकडून देखील लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईकरता परवानगी देण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी

First published: June 7, 2019, 9:35 AM IST
Tags: terrorist

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading