जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरहून जम्मूकडे जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर काल दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर दहशतवादी महामार्गालगतच्या एका इमारतीत लपून बसले. जवानांनी परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांना जवानांनी सडेतोड उत्तर दिलं. या चकमकीत लश्कर- ए-तोयबाचा विभागीय कमांडर फुरकान मारला गेला

  • Share this:

 05 डिसेंबर:  जम्मू काश्मिरमधील काजीगुंडमध्ये काल रात्री झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या विभागीय कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.  दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं.

श्रीनगरहून जम्मूकडे जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर काल दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर दहशतवादी महामार्गालगतच्या एका इमारतीत लपून बसले. जवानांनी परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांना जवानांनी सडेतोड उत्तर दिलं. या चकमकीत लश्कर- ए-तोयबाचा विभागीय कमांडर फुरकान मारला गेला असून तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी दिली.

फुरकानसह अबु माविया आणि यावर यालाही कंठस्नान घालण्यात आलं. दरम्यान, जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती वैद्य यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

First published: December 5, 2017, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading