Home /News /national /

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, जैशच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला लष्कराने ठार केले

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, जैशच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला लष्कराने ठार केले

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मिरहामा भागात शनिवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांमध्ये पोलीस आणि लष्कराची चकमक सुरू झाली आहे. (terrorist encounter in jammu kashmir) या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा (jaish e mohammad) एक पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

पुढे वाचा ...
    श्रीनगर, 23 एप्रिल : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मिरहामा भागात शनिवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांमध्ये पोलीस आणि लष्कराची चकमक सुरू झाली आहे. (terrorist encounter in jammu kashmir) या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा (jaish e mohammad) एक पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. याबाबतची माहिती काश्मीर रेंजचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. अजूनही लष्करी ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, ही घटना अशा वेळी होत् आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सांबामध्ये पल्ली पंचायतचा दौरा करणार आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मिरमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. एक दिवस आधी, जम्मू आणि काश्मिरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी 36 तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. यामध्ये दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च कमांडर युसूफ कांतरू याचाही समावेश होता. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर युसूफ कांतरू याच्यासह दोन दहशतवादी गुरुवारी चकमकीत ठार झाले. तर शुक्रवारी आणखी एक दहशतवादी मारला गेला. युसूफ डार, हिलाल शेख उर्फ हंजल्ला आणि फैसल डार, अशी यांची नावे आहेत. तर चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतरू अनेक सुरक्षा दलांचे कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्येत सामील होता आणि काश्मीर खोऱ्यातील टॉप 10 वाँटेड दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश होता. कांतरू हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय सदस्य म्हणून सामील झाला होता आणि त्याला २००५ मध्ये अटक झाली होती. हेही वाचा - मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता यानंतर 2008मध्ये त्याला सोडण्यात आले. मात्र, 2017मध्ये पुन्हा तो हिज्बुल या दहशतवादी संघटनेसोबत जुळला. यानंतर त्याने पुन्हा निष्पाप नागरिक, पोलीस कर्मचारी आणि राजनितीक कार्यकर्त्यांच्या हत्या करायला सुरुवात केली. यानंतर तो हिज्बुल मधून सैन्यदलात सहभागी झाला. मार्च 2020 मध्ये विशेष पोलीस अधिकारी मोहम्मद इश्फाक दार आणि त्याचा भाऊ उमर अहमद दार, सप्टेंबर 2020 मध्ये बडगाम जिल्ह्यातील खग भागात बीडीसी अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंग आणि डिसेंबर 2017 मध्ये सीआरपीएफ जवान रियाझ अहमद रादर यांच्या हत्येतही कांतरूचा हात होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indian army, Jammu and kashmir, Terrorist

    पुढील बातम्या