एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त; सॅटेलाईट फोटो आले समोर

भारताच्या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली. त्यामध्ये दहशतवाद्यांच्या उद्धवस्त झालेल्या कॅम्पचे फोटो आता समोर आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 11:07 AM IST

एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त; सॅटेलाईट फोटो आले समोर

भारतीय हवाई दलाच्या मिराज - 2000 या विमनांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. जवळपास 21 मिनिटं बॉम्ब वर्षाव सुरू होता. या धाडसी कारवाईमध्ये 12 मिराज -2000 विमानांनी सहभाग घेतला होता.

या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शिवाय, 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचं देखील वृत्त आहे. यामध्ये 25 कमांडरचा समावेश असून कारवाईबद्दल पुराव्यांची मागणी देखील आता होताना दिसत आहे. तर, पाकिस्ताननं कारवाई झालीच नाही असा कांगावा केला आहे.

Loading...

दरम्यान सर्व दाव्यांना खोटे ठरवणारे फोटो आता समोर आले आहेत. बालाकोटमध्ये ज्या ठिकाणी हल्ला केला गेला त्याठिकाणचे सिंथेटिक अॅपर्चर रडार (एसएआर) फोटो सरकारकडे आहेत. त्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मिराज – 2000 विमानांना दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. मिराजला ढगांमुळे फोटो घेता आले नाहीत. पण, मिराजच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुखोई 30 MKIनं मात्र दहशतवाद्यांच्या तळाचे हल्ल्यानंतरचे फोटो घेतले.

हल्ल्यामध्ये मसूद अजहरचा मेव्हुणा देखील ठार झाल्याची शक्यता आहे. कारण तळाची जबाबदारी तो सांभाळत होता. तर, यकृताच्या आजारानं अजहरचा देखील पाकिस्तानातील रूग्णालयात मृत्यू झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. पाकिस्ताननं मात्र याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...