News18 Lokmat

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कॅश व्हॅनवर हल्ला, 5 पोलिसांसह 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

दहशतवाद्यांनी कुलगाम येथील एका बँकेच्या कॅश व्हॅनवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले तर दोन जे अँड के बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 1, 2017 07:17 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कॅश व्हॅनवर हल्ला, 5 पोलिसांसह 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

01 मे : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा हल्ला केलाय. दहशतवाद्यांनी कुलगाम येथील एका बँकेच्या कॅश व्हॅनवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले तर दोन जे अँड के बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी जे अँड के बँकेच्या कॅश व्हॅनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी कॅशसह रायफल पळवून नेल्यात. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून हत्यार लुटण्यासाठी असे हल्ले केले जात आहे. आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जे अँड के बँकेच्या कॅश व्हॅनला साॅफ्ट टार्गेट केलं.

दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचारी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना व्हॅनमधून बाहेर काढून त्यांची हत्या केली अशी माहिती दक्षिण काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक एस.पी, पानी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2017 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...