मराठी बातम्या /बातम्या /देश /स्वातंत्र्यदिनाआधी दहशतवाद्यांचा पुन्हा कुरापती, जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला

स्वातंत्र्यदिनाआधी दहशतवाद्यांचा पुन्हा कुरापती, जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला

 स्वातंत्र्यदिनाआधी पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाआधी पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. याआधी दहशतवाद्यांकडून आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता. आता ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांनी यावेळी पोलिसांना टार्गेट केलं. कुलगाम इथल्या कामोह भागात शनिवारी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला झाला. यामध्ये एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान पोलीस अधिकारी ताहिर खान शहीद झाले.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर भागात दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत. जवानांकडून या भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. बडगाम जिल्ह्यात जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट आणि क्लर्क राहुल भटची हत्या केली होती.

जवानांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा सापडला आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांनी जवानांच्या कॅम्पवर आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन करून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं.

First published:

Tags: Independence day, Jammu kashmir, Terrorist attack