Home /News /national /

BREAKING : श्रीनगरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान शहीद, 11 जखमी

BREAKING : श्रीनगरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान शहीद, 11 जखमी

झेवन (Zewan in Pantha Chowk ) परिसरात दहशतवाद्यांनी जवानांच्या (Terrorists fired police vehicle) ताफ्यावर हल्ला चढवला आहे.

    श्रीनगर, 13 डिसेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. श्रीनगरमधील (Srinagar ) झेवन (Zewan in Pantha Chowk ) परिसरात दहशतवाद्यांनी जवानांच्या (Terrorists fired police vehicle) ताफ्यावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहे तर  11 जवान जखमी झाले आहे. तर काही जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला आहे.  जेवन परिसरात ही घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहे तर ११ जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात  काही जवान गंभीर जखमी झाले आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंथा चौक खोनमोह रोड इथं भारतीय रिजर्व्ह पोलीस (IRP) च्या ९ व्या बटालियन गाडीवर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी या गाड्यांना निशाणा साधून बेछुट गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जखमी जवानांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसले आहे. जवानांनी या परिसराला घेराव घातला असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या