जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, 4 जवान शहीद तर 8 जण जखमी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, 4 जवान शहीद तर 8 जण जखमी

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये हंदवाडात बाबागुड लंगेट परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे तर या हल्ल्यात 8 जवान जखमी झाले आहेत.

  • Share this:

जम्मू कश्मीर, 01 मार्च : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये हंदवाडात बाबागुड लंगेट परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे तर या हल्ल्यात 8 जवान जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान हे दहशतवाद्यांचे शव आणण्यासाठी गेले होते. यामध्ये 2 दहशतवाद्यांचे 2 मृतदेह होते. भारतीय जवान तिथे पोहचताच एक दहशतवादी अचानक उठला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये गोळीबारामध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या सुरक्षादलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. अभिनंदन भारतात परतत असतानाच पकिस्तानने शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने ही आगळीक केली. भारतानेही पाकिस्तानच्या या कुरापतीला चौख प्रत्युत्तर दिलं आहे.

शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. सायंकाळी नौशेरा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेल्या गेल्या आठ दिवसांपासून भारतीय चौक्यांवर गोळीबार करत असून दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने 36 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'टायगर इज बॅक', विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल

Loading...

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना अखेर भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. आज वाघा बार्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत भारतात परतले आहेत. पण यावेळी वाघा बॉर्डवर होणारा 'बीटिंग द रिट्रीट' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

भारत आणि पाकिस्तानची सीमा असलेल्या वाघा बॉर्डवरून अखेर भारताचा वाघ मायदेशी परतला आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भारतीयांनी वाघा बॉर्डर परिसरात अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांच्या गाड्यांचा ताफा बॉर्डरच्या आतमध्ये येताच ढोल ताशांचा गजर सुरू झाला. मोठ्या प्रमाणात जल्लोष हा सध्या वाघा बॉर्डरवर पाहण्यात येत आहे.


तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर डोळ्यात नक्कीच अश्रू येतील



 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...