या महत्त्वाच्या ठिकाणी होऊ शकतो दहशती हल्ला, अलर्ट जारी

या महत्त्वाच्या ठिकाणी होऊ शकतो दहशती हल्ला, अलर्ट जारी

भारतात दहशतवादी हल्ले व्हावेत यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही दहशतवादी गटांना चिथावणी देत असल्याची खळबळजनक माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 11 ऑगस्ट : काश्मीरमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या आसपास हा हल्ला होऊ शकतो अशी शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केलीय. दहशतवादी अफगाणिस्तान मार्गे भारतात येऊ शकतात. भारतात असे दहशतवादी हल्ले व्हावेत यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही दहशतवादी गटांना चिथावणी देत असल्याची खळबळजनक माहितीही गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केलीय.

महापूरातल्या मृत्यूची संख्या 40 वर, आर्थिक नुकसानीचा तर हिशेबच नाही

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. दहशतवादी हल्ल्यासाठी ड्रेनेज, रस्त्यांमधले खड्डे किंवा अन्य मार्गांचा वापर करू शकतात अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. दहशतवादी IED, सरकारी गाडी आणि लष्करी युनिफॉर्मचा वापर करू शकतात अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.

बिफ व पोर्कवरून Zomato पुन्हा वादात सापडली; 'डिलीव्हरी बॉय म्हणाले...'

सुरक्षा संस्थांनी काही संदिग्ध फोन कॉल्स रेकॉर्ड केलेत. त्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आलाय. तीन ते चार दहशतवादी अफगाणिस्तान मार्गाने दाखल होऊ शकतात. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही या गटांना चिथावणी देत आहे. दिल्लीसोबतच लखनऊ आणि गाझीयाबादमध्येही असे हल्ले होऊ शकतात अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तिंनाही लक्ष्य केलं जावू शकते असा इशाराही देण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. विमानतळांवरही दक्षतेचा इशारा देण्यात आलाय. देशभरात दहशतवादी गटांच्या स्लिपर सेल्सवर करडी नजर ठेवण्यात येत असून अनेक ठिकाणी छापेही घालण्यात आले आहेत.

First published: August 11, 2019, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading