हाफीज सईदचा विश्वासू अबू मूसा भारतात घुसण्याच्या तयारीत

भारताच्या इशाऱ्यानंतरदेखील दहशतवादी कारवाया करण्यासाठी हाफीज सईदचा विश्वासू काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीमध्ये आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 11:31 AM IST

हाफीज सईदचा विश्वासू अबू मूसा भारतात घुसण्याच्या तयारीत

श्रीनगर, 25 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं इशारा देत दहशतावाद्यांचा खात्मा करायला सुरुवात केली आहे. पण, त्यानंतर देखील दहशतवादी भारतात घुसून अतिरेकी कारवाया करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद त्यासाठी प्रयत्नशील असून त्यानं आता आपला विश्वासू अबू मूसाला भारतात पाठवण्याची तयारी केली आहे. पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये अबू मूसा काश्मीरमध्ये दाखल होईल,असं बोललं जात आहे.

काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर अबू मूसा तरूणांचं ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करणार आहे. त्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. यावेळी अबू मूसा दहशतवादी कारवायांसाठी तयार झालेल्या तरूणांना खास ट्रेनिंग देखील देणार असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणादेखील अधिक सतर्क झाल्या आहेत.

खूप मोठी चूक केली, भारताचा इशारा

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना यांची किंमत चूकवावी लागेल असा इशारा दिला आहे. त्यादृष्टीनं भारतानं दहशतवादांचा खात्मा करायला सुरूवात देखील केली आहे. शिवाय, पाकिस्तानची नाकेबंदी करायला देखील भारतानं सुरूवात केल्यानं आता पाकिस्तान जमिनीवर आला असून त्यानं भारताकडे एक संधी मागितली आहे. शिवाय, ठोस पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाईचं आश्वासन देखील दिलं आहे.

Pulwama : भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर, इम्रानने मागितली 'ही' संधी

Loading...

कुलगाममध्ये 3 दहशतवादी ठार, DSP शहीद

रविवारी काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्याकारवाईमध्ये 3 दहशतवादी झाले होते. तर, डीएसपी अमन ठाकूर शहीद झाले होते. यामध्ये लष्कराचा मेजर, 2 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले होते. तर, शुक्रवारी 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीमध्ये जैशचा कमांडर आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड राशिद गाजीसह एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

शिवाय, उत्तर प्रदेशमध्ये एटीएसनं कारवाई करत जैश - ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पैसे पुरवणाऱ्या शहानवाज आणि आकिफ अहमद मलिकला ताब्यात घेतलं होतं. शहानवाज हा मूळचा काश्मीरमधील कुलगामचा तर आकिफ हा पुलवामाचा रहिवासी आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता ही कारवाई करण्यात आली होती.

दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन ऑल आऊट' ही मोहिम राबवली आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलं असा दावा केला. मात्र या करावाईमध्ये लष्करी जावनही मोठ्या प्रमाणावर शहीद झाले ही वस्तुस्थिती आहे. दोन अतिरेक्यांचा खात्मा करताना एका जवानाला वीर मरण पत्करावं लागलं.

साउथ आशिया टेरेरिझम पोर्टल (SATP) ही संस्था दहशतवादाचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सर्वाधिक हिंसक झाल्याचं म्हटलं आहे.


VIDEO : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा, सभेत एकच हशा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...