मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहशतवादाला धर्म आणि देश नसतो – सिद्धू

दहशतवादाला धर्म आणि देश नसतो – सिद्धू

दहशतवादी हल्ल्याचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी जाहीर निषेध केला आहे.

दहशतवादी हल्ल्याचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी जाहीर निषेध केला आहे.

दहशतवादी हल्ल्याचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी जाहीर निषेध केला आहे.

चंदीगड, 15 फेब्राुवारी : गुरूवारी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवा, दहशतवाद्यांचा खात्मा करा अशा घोषणा दिल्या जात आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर माजी क्रिकेटर आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी 'दहशतवादाला धर्म आणि देश नसतो' अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध देखील केला आहे. तसेच या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील सिद्धू यांनी केली आहे.

यावेळी कर्तारपूर कॉरिडोरवर काही परिणाम होईल का? असे पत्रकारांनी विचारला असता त्यावर बोलणं मात्र सिद्धूंनी टाळलं.

दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

गुरूवारी स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळून दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं. यामध्ये 44 जवान शहिद झाले. पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे.

VIDEO : Phulwama हल्ल्याचा तात्काळ बदला घ्या - शिवसेना

First published:

Tags: Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Terror attack