'जैश'ला कलम 370चा घ्यायचाय बदला; PM मोदींसह या व्यक्तीवर हल्ल्याचा कट!

'जैश'ला कलम 370चा घ्यायचाय बदला; PM मोदींसह या व्यक्तीवर हल्ल्याचा कट!

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम रद्द केल्यानंतर त्याचा बदला घेण्याचा निर्णय दहशतवाद्यांनी घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान भारताला धमकी देण्यास सुरुवात केली आहे. केवळ पाकिस्तानच नव्हे तर दहशतवादी संघटनांनी देखील मोदी सरकारच्या या निर्णयाचा बदला घेण्याचा कट आखला आहे. पाकिस्तानकडून अभय मिळणाऱ्या जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांनी भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखला आहे. यात प्रामुख्याने महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षासल्लागार अजित डोवल यांच्यावर हल्ले करण्याचा कट 'जैश' आखत आहे. यासाठी विशेष दहशतवाद्यांचे पथक तयार करत असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. कलम 370 हटवल्यानंतरचा बदला घेण्यासाठी जैशकडून अशा पद्धतीचा कट आखला जात आहे. विशेोष म्हणजे पाकिस्तानची गु्प्तचर यंत्रणा आयएसआयमधील एक मेजर या हल्ल्यासाठी जैशच्या दहशतवाद्यांना मदत करत आहे. यासंदर्भात गु्प्तचर यंत्रणेला पाकिस्तानी दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या कमांडर सोबत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला आहे.

30 शहरात दिला हाय अलर्ट

जैशकडून भारतात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याने देशातील 30 शहरातील पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. यात जम्मू, अमृतसर, पठानकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आमि लखनौसह 30 शहरात अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर तसेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये डोवल यांनी महत्त्वाची भूमीका पार पाडली होती. याच कारणामुळे ते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

भारतीय लष्कराने काश्मीरमधील जैशेच्या दहशतवाद्यांना एका पाठोपाठ एक मारले आहे. त्यामुळे जैशला भारताविरुद्ध बदला घ्यायचा आहे. बालाकोट येथे भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले होते. गु्प्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारताने 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवल्यामुळे जैशला बदला घ्यायचा आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी हल्ले करणे अवघड झाले आहे. पाकिस्तान लष्कराकडून सातत्याने दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत केली जात आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून शस्त्रसंधीचे उल्लघन केले जाते ज्यामुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याची संधी मिळेल. POKमधून 12 आणि 13 सप्टेंबरच्या रात्री आत्मघाती हल्लेखोर घुसखोरीच्या प्रयत्ना होते. पण हा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता.

VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 08:03 AM IST

ताज्या बातम्या