धक्कादायक; ज्या जिल्ह्यात करतारपूर गुरुद्वारा तेथेच दहशतवादी कॅम्प!

करतारपूर गुरुद्वारा ज्या जिल्ह्यात आहे तेथेच दहशतवादी कॅम्प...

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 09:23 AM IST

धक्कादायक; ज्या जिल्ह्यात करतारपूर गुरुद्वारा तेथेच दहशतवादी कॅम्प!

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: गुरु नानक देव यांच्या पवित्र स्थळ असलेल्या डेरा बाबा नानक साहिब येथे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या करतारपूर कॉरिडोर(Kartarpur Corridor)चे काम पूर्ण झाले आहे. या आठवड्यात या कॉरिडोरचे उद्घाटन होणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या जिल्ह्यात हे गुरुद्वारा आहे तथेच दहशतवादी कॅम्प (Terror Camp)देखील आहे.

करतारपूर कॉरिडोर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार याच जिल्ह्यात दहशतवादी कॅम्प देखील आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी कॅम्प पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरीदके, शाकरगढ आणि नारोवाल येथे आहेत. धक्कादायकबाब म्हणजे या दहशतवादी कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात पुरुषांसोबत महिला दहशतवादी देखील प्रशिक्षण घेत आहेत.

पाकिस्तानने डेरा बाबा नानक साहिब करतारपूर येथे यात्रा करण्यासाठी प्रत्येक दिवशी पाच हजार लोकांना परवानगी दिली आहे. यासाठी पाकिस्तान प्रत्येक व्यक्तीकडून 20 डॉलर सेवा शुक्ल घेणार आहे. या सेवा शुल्कामुळे पाकिस्तानला प्रत्येक दिवशी लाखो रुपयांची कमाई होणार आहे. यातील गुरपर्व या दिवशी फक्त सेवा शुक्ल आकारले जाणार नसल्याचे पाकने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी करतारपूर परिसर आणि गुरुद्वारा साहिब यांचे फोटो शेअर केले होते. गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंती निमित्त शिख यात्रेकरूच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचे खान म्हणाले.

याच महिन्या शिख धर्माचे संस्थापक पहिले गुरु, गुरुनानक देव यांची 550वी जयंती साजरी केली जात आहे. पाकिस्तानमधील करतारपूर येथील रावी नदीच्या किनाऱ्यावर स्थित दरबार साहिब गुरुद्वारेत गुरु नानक देव यांनी आयुष्यातील अखेरचे 18 वर्ष घालवले होते. हा भाग पाकिस्तानमधील पंजाबमधील गुरदासपूर येथील डेरा बाबा नानक गुरद्वारेला करतारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारेशी जोडतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...