Alert ! समुद्र मार्गानं होऊ शकतो दहशतवादी हल्ला - नौदल प्रमुख

Alert ! समुद्र मार्गानं होऊ शकतो दहशतवादी हल्ला - नौदल प्रमुख

दहशतवादी समुद्र मार्गानं घुसून हल्ला करू शकतात असं नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : दहशतावाद्यांना समुद्र मार्गानं घुसून हल्ला कसा करायचा? याचं प्रशिक्षण दिलं गेल्याचं नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी म्हटलं आहे. आपला शेजारील देश समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी म्हटलं आहे. शिवाय, दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठं आव्हान उभं असल्याचं देखील नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईक करत भारतानं 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. शिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये देखील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. तसेच, दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य आता देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये देखील वळवला आहे. गुप्तचर विभागानं सूचना दिल्यानंतर प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशा वेळी नौदल प्रमुख सुनिल लांबा यांच्या विधानाला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबईवर झालेला हल्ला

26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात आज देखील ताज्या आहेत. यावेळी 10 दहशतवाद्यांनी समुद्र मार्गानं मुंबईमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, कामा रूग्णालय या ठिकाणी गोळीबार करत ग्रेनेड देखील फेकले होते. या हल्ल्यामध्ये जिवंत सापडलेल्या कसाबला अखेर फासावर लटकवण्यात आलं होतं. त्यामुळे सुनील लांबा यांच्या विधानाकडे आता गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर आता हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: महानगरी मुंबई होणार आणखी सुसाट

First published: March 5, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading