मराठी बातम्या /बातम्या /देश /

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय

26 एप्रिल : जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील पंजगाम इथल्या लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी आज पहाटे हल्ला केला आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र या धुमश्चक्रीत लष्कराचे 5 जवान शहीद झाले आहेत.

कुपवाड्यामधील पंजगाम येथील आर्मी कॅम्पवर आज (गुरुवारी) पहाटे 4 वाजेच्या सुमारास 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील नौहट्टा इथल्या सीआरपीएफच्या छावणीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला होता.

First published:

Tags: 2-ultras-dead, 5 जवान शहीद, Jammu kashmir, Terror attack, जम्मू काश्मीर, दहशतवादी हल्ला