पुलवामात दहशतवादी हल्ला; 2 जवान शहीद

पुलवामात दहशतवादी हल्ला; 2 जवान शहीद

पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी चकमक झाली आहे. संबुरा गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती

  • Share this:

पुलवामा,03 नोव्हेंबर: जम्मू-काश्मिरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली आहे.या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहे तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात लष्कलराला यश आले आहे.

पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी चकमक झाली आहे. संबुरा गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्करानं या भागात शोध मोहिम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन सुरक्षारक्षक शहीद झाले आहेत. तर एक दहशतवादीही ठार झाला.

दरम्यान चकमक अजूनही सुरू असून अजूनही काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading