Home /News /national /

भयंकर प्रकार; मंदिरातच शरीराचा महत्त्वाचा अवयव कुऱ्हाडीने कापून देवीला केला अर्पण

भयंकर प्रकार; मंदिरातच शरीराचा महत्त्वाचा अवयव कुऱ्हाडीने कापून देवीला केला अर्पण

मुलगा व्हावा यासाठी चौधरी नावाच्या व्यक्तीने देवीला नवस केला होता.

    भोपाळ, 21 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) दमोह जिल्ह्यातून अंधविश्वासशी संबंधित एक हैराण (shocking News) करणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने नवस फेडण्यासाठी आपलं बोट कापून मंदिरात ठेवलं. याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे बोट कापणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्याला याचा काहीच त्रास झाला नाही.( In the temple an important part of the body was cut off with an ax and offered to the goddess) दमोहमधील पटेरा पोलीस ठाणे हद्दीतील सहजपूर गावात अंधविश्वासात गावकरी महेंद्र चौधरीने आपलं बोट कापून देवीला अर्पण केलं. त्याने सांगितलं की, मूल होण्यासाठी महेंद्रने देवीकडे नवस केला होता. तो पुढे म्हणाला की, त्याने केलेला नवस 10 वर्षांपूर्वीच पूर्ण झाला होता. मात्र तो देवीला केलेला नवस विसरला होता. त्यामुळे एक आठवड्यापूर्वी त्याने नवस पूर्ण केला. कुऱ्हाडीने कापलं बोट.. चौधरीने सांगितलं की, बोट कापल्यानंतरही त्याला काहीच त्रास झाला नाही. सध्या चौधरीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे त्याची प्रकृती बरी असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, महेंद्रने 10 वर्षांपूर्वी मरई देवीच्या मंदिरात गेला होता. त्यावेळी त्याला मूल नव्हतं. मूल होण्यासाठी त्याने मंदिरात प्रार्थना केली आणि तेथेच देवीला नवस केला. जर मुलगा झाला तर तो आपलं बोट कापून मंदिरात अर्पण करेल. आज 10 वर्षांनंतर महेंद्रने मरई देवीच्या मंदिरात येऊन कुऱ्हाडीने बोट कापलं आणि देवीला अर्पण केलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या