Elec-widget

पती-पत्नीच्या भांडणात व्हाॅट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला खावी लागली तुरुंगाची हवा

पती-पत्नीच्या भांडणात व्हाॅट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला खावी लागली तुरुंगाची हवा

इंदौरमध्ये अशी एक घटना समोर आलीय. यात व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसह दोघांना तुरुंगाची हवा खावी लागली.

  • Share this:

इंदौर, 19 मार्च : तुम्ही एखादा व्हाॅटसअॅप ग्रुप बनवला असेल आणि तुम्ही त्याचे अॅडमिन असाल तर सावध राहा. ग्रुपमधल्या इतरांच्या भांडणामुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. इंदौरमध्ये अशी एक घटना समोर आलीय. यात व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसह दोघांना तुरुंगाची हवा खावी लागली.

इथे पतीनं आपल्या पत्नीला बदनाम करण्यासाठी व्हाॅट्सअॅप ग्रुपचा वापर केलाय. याची शिक्षा ग्रुप अॅडमिनलाही झाली. त्यालाही तुरुंगात जावं लागलं. ही घटना घडली इंदौरच्या एरोड्रम विभागात. इथल्या एका महिलेनं पोलिसांत तक्रार केली की व्हाॅट्सअॅप ग्रुपवर तिला कोणी अश्लील मेसेज पाठवतो. पोलिसांनी काहीच कारवाई  केली नाही, म्हणून ती महिला कोर्टात गेली.

कोर्टानं महिलेच्या याचिकेवर पोलिसांना तपास करायचा आदेश दिला. तेव्हा असं समोर आलं की हा ग्रुप इंदौर सोशल मीडिया नावानं सुरू होता. या महिलेचा पती सन्नी गोलियांचा नातलग दुर्गेश गोलियानं हा ग्रुप तयार केलाय. दुर्गेशनं या महिलेला अॅड केलं. ग्रुपमध्ये महिलेचा पती सन्नी आणि दीर राजकुमारही होते. सन्नीला बायकोकडून घटस्फोट हवा होता. त्यानं मुद्दाम ही खेळी खेळली.

त्यानं ट्रू काॅलरवर पत्नीचं अश्लील नाव लिहिलं. त्यामुळे महिलेला रोज अश्लील फोन आणि मेसेज यायला लागले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सन्नी आणि राजकुमार यांनी सांगितलं की त्या महिलेच्या घटस्फोटचा खटला कोर्टात चाललाय. तिला मुद्दाम बदनाम करण्यासाठी इंदौर सोशल मीडिया नावाच्या ग्रुपमधून तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत होते. कोर्टानं तीन आरोपींना तुरुंगात पाठवलं.

इंदौरमध्ये अशा प्रकारे पहिल्यांदाच व्हाॅट्सअॅप ग्रुपवरून महिलेला बदनाम करण्यात येत होतं. त्यामुळे अॅडमिनलाही तुरुंगात जावं लागलं.

Loading...


धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...