पाकिस्तानातल्या या 10 गोष्टी भारतात आहेत प्रचंड लोकप्रिय

पाकिस्तानातल्या या 10 गोष्टी भारतात आहेत प्रचंड लोकप्रिय

जम्मू काश्मीरसंबंधीचं कलम 370 भारताने संपवण्याचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तान हडबडला आणि आता भारताबरोबरचा व्यापार थांबवण्याची धमकी त्या देशाने दिली आहे. अशा कुठल्या पाकिस्तानी गोष्टी आहेत, ज्या भारतात मोठ्या प्रमाणावर आयात होतात?

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : भारताबरोबरचे व्यापार आणि राजनैतिक संबंध संपवण्याची भाषा पाकिस्तानने सुरू केली आहे. जम्मू काश्मीरसंबंधीचं कलम 370 भारताने संपवण्याचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तान हडबडला आणि आता भारताबरोबरचा व्यापार थांबवण्याची धमकी त्या देशाने दिली आहे.  अशा कुठल्या पाकिस्तानी गोष्टी आहेत, ज्या भारतात मोठ्या प्रमाणावर आयात होतात? आपल्या देशात पाकिस्तानातून येणाऱ्या मालामध्ये मोठ्या प्रमाणावर फळांचा समावेश आहे. तसंच चामडं आणि सिमेंटचीही आयात पाकिस्तानातून होते. पाकिस्तानने भारताबरोबरचा व्यापार थांबवला तर आधीच अडचणीत असलेली पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल यात शंका नाही.

भारतात पाकिस्तानातून येणाऱ्या या आहेत मुख्य 10 गोष्टी

भारतात पाकिस्तानातून होणारी आयात 2046-17 च्या तुलनेत 2017-18 मध्ये वाढली आहे. 455.5 अब्ज डॉलर एवढ्या मूल्याचा माल पाकिस्तानातून भारतात यायचा, तोच आता 488.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

ही फळं येतात पाकिस्तानातून

2017 साली भारतात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी फळं आली. त्यामध्ये सुकामेव्याचा समावेश होता. याशिवाय टरबूजही मोठ्या प्रमाणावर आली. पाकिस्तानातून आलेली फळं मुख्यत्वे काश्मिरी बाजापेठेत विकली जातात. शिवया दिल्लीच्या फळबाजाराजातही पाकिस्तानी फळं येतात.

मीठापासून सिमेंटपर्यंत

फळांनंतर येतो चुना, दगड आणि सिमेंटचा नंबर. या गोष्टी पाकिस्तानातून आयात होतात. शिवाय पाकिस्तानी मीठही भारतीय बाजारपेठेत येतं. सैंधव मीठ पाकिस्तानातून येतं. अनेक सौंदर्य प्रसाधनं आणि उत्पादनांमध्ये वापरली जाणारी मुलतानी माती पाकिस्तानातून येते.

तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानातून आयात होणारी गोष्ट आहे चामडं. चर्मउद्योगाला पाकिस्तानी चामड्याचा उपयोग होतो. वाचून आश्चर्य वाटेल पण पाकिस्तान आपल्याला पेट्रोलियम उत्पादनंसुद्धा पाठवतो. पेट्रोलियम आणि तेल पाकिस्तानातून आयात केलं जातं.

कापूस आणि तांबे

पाकिस्तानातून भारतात काही मेडिकल उपकरणांची आयात होते. मेटल कंपांउंड, कार्बोनिक केमिकल्स या शेजारी देशातून येतात. शिवाय पाकिस्ताना कापूस आणि ताग्याचा मोठा निर्यातदार आहे. भारतालाही पाकिस्तानातून कापड आणि कापूस मिळतो. याशिवाय स्टील आणि पोलाद पाकिस्तानातून भारतात येतं. तांब्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर होतो. हे तांबं येतं पाकिस्तानातून.

हे पाकिस्तानी ब्रँड्स आहेत लोकप्रिय

भारतात काही मोजक्या पाकिस्तानी ब्रँड्सची आउटलेट्स आहेत. त्यापैकी जास्त करून ब्रँड्स काश्मीरमध्ये विकले जातात. शिवाय उत्तर भारताच्या काही भागात याची उत्पादनं दिसतात. पाकिस्तानी एंब्रॉयडरी आणि जरीकाम भारतात विकलं जातं. बेरीजी या फॅब्रिक ब्रँडचं दिल्लीत स्टोअर आहे. शिवाय जुनैद जमशेद नावाचा ब्रँडही उत्तर भारतात दिसतो. याशिवाय लाहौरी कुर्ते, पेशावरी चप्पल हेसुद्धा दिल्लीत लोकप्रिय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 10:22 PM IST

ताज्या बातम्या