आता गोव्यातही राजकीय भूकंप? काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर

आता गोव्यातही राजकीय भूकंप? काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर

कर्नाटकनंतर आता गोव्यातही राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण गोव्यातही काँग्रेस पक्षात फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • Share this:

पणजी, 10 जुलै : कर्नाटकनंतर आता गोव्यातही राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण गोव्यातही काँग्रेस पक्षात फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे 10 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या 10 आमदारांनी विधानसभा सभापतींची भेट घेतली. हे दहाच्या दहा आमदार आपला वेगळा गट करणार असून ते राजीनामा देण्याच्याही तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(वाचा :चिखलफेक प्रकरणी नितेश राणेंना जामीन मंजूर, पण या आहेत अटी)

गोव्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसकडे एकूण पंधरा आमदारांचे संख्याबळ आहे. या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसकडे केवळ पाचच आमदार राहतील. दरम्यान, भाजपाचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात आहेत. प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि रवी नाईक असे पाच आमदार वगळता उर्वरित 10 आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(वाचा :कर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर)

दुसरीकडे, मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासह कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डि. के. शिवकुमार यांना मुंबईतील रेनेसान्स हॉटेलच्या बाहेरून पोलिसांनी बुधवारी (10 जुलै) ताब्यात घेतलं. कर्नाटकातील 10 बंडखोर वास्तव्यास असलेल्या या हॉटेलबाहेर जमावबंदी आहे. असं असतानाही काँग्रेस नेते हॉटेलबाहेर थांबल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

कर्नाटकमधील 10 बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील आता मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.

'काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जिवाला धोका आहे,' असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहिलं. आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

(वाचा :पुढचे 2 दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी)

'शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही' असंही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या सगळे 10 आमदार रेनेसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाठी आलेल्या डी.के. शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं होतं.

मला माझ्या रूममध्ये जाऊ दिलं जात नाही. मला हॉटेलमध्ये विश्रांती घेऊन कॉफी प्यायची आहे. माझ्याकडे कुठलंही शस्त्र नाहीय, तरीही मला पोलीस आत सोडत नाहीत. अशा प्रकारे मला रोखता येणार नाही,' अशी भूमिका शिवकुमार यांनी घेतली होती. मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कल्याणमध्ये थोडक्यात टळली सुरत दुर्घटनेची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांचा वाचला जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 08:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading