Home /News /national /

सामना सुरू असताना कोसळली प्रेक्षकांची गॅलरी; 200 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सामना सुरू असताना कोसळली प्रेक्षकांची गॅलरी; 200 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Gallery collapsed during match: फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या शेकडो प्रेक्षकांवर गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तब्बल 200 जण जखमी (200 injured) झाले आहेत.

    मल्लपुरम, 20 मार्च: फुटबॉलचा सामना (Football Match) पाहण्यासाठी आलेल्या शेकडो प्रेक्षकांवर गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तब्बल 200 जण जखमी (200 injured) झाले आहेत. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅलरी कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा ठोका चुकवणारा घटनेचा व्हिडीओ (Viral video) समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना केरळमधील (Kerala) वंदूर जिल्ह्यातील मलाप्पूरमनजीक असणाऱ्या पुंगूड गावातील आहे. शनिवारी याठिकाणी फुटबॉलच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केरळमधील फुटबॉल प्रेमींची संख्या पाहता, याठिकाणी प्रेक्षकांसाठी तात्पुरत्या स्वरुपाची गॅलरी बनवण्यात आली होती. शनिवारी रात्री फुटबॉल सामना सुरू असताना ही गॅलरी अचानक कोसळली (temporary gallery collapsed) आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण 200 प्रेक्षक जखमी झाले आहेत. यात 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. हेही वाचा-डीजेच्या तालावर केलेला धांगडधिंगा जीवावर बेतला,रंगपंचमीच्या दिवशीच तरुणाची हत्या जखमी झालेल्या प्रेक्षकांना आयोजकांनी तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. खरंतर, केरळमध्ये फुटबॉल खेळाचा मोठा चाहता वर्ग आहे. अगदी गावातील सामन्यांना देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी जमते. दरम्यान शनिवारी रात्री मलप्पुरम याठिकाणी आयोजित केलेला सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हेही वाचा-तरुणांची हुल्लडबाजी, धावत्या रिक्षावर मारला वॉटर बलून; भयंकर अपघाताचा VIDEO संबंधित सामना प्रेक्षकांना व्यवस्थित पाहता यावा, यासाठी आयोजकांनी तात्पुरत्या स्वरुपाची गॅलरी उभी केली होती. पण या गॅलरीत क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने संपूर्ण गॅलरीत कोसळली आहे. या गॅलरीसोबत शेजारी उभा करण्यात आलेला वीजेचा मोठा पोल देखील कोसळला आहे. ही घटना घडताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस आता आयोजकांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Kerala

    पुढील बातम्या