मराठी बातम्या /बातम्या /देश /एक माशामुळे मच्छिमार झाला लखपती, नेमका काय आहे प्रकार?

एक माशामुळे मच्छिमार झाला लखपती, नेमका काय आहे प्रकार?

एका परदेशी कंपनीने त्याला विकत घेतले. या बहुमोल माशापासून जीवरक्षक औषधे बनवली जातात.

एका परदेशी कंपनीने त्याला विकत घेतले. या बहुमोल माशापासून जीवरक्षक औषधे बनवली जातात.

एका परदेशी कंपनीने त्याला विकत घेतले. या बहुमोल माशापासून जीवरक्षक औषधे बनवली जातात.

नई दिल्‍ली, 27 जून : पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूरमध्ये एक मासा (Fish) तुम्ही विचारही केला नसेल, इतक्या रुपयांना विकला गेला आहे. तेलिया भोला (Telia Bhola Fish) हा महाकाय मासा रविवारी शिबाजी कबीर नावाच्या मच्छिमाराने पकडला होता. यानंतर दिघ्यातील लागलेल्या या लिलावातील बोलीमध्ये 55 किलो वजनाचा हा मासा तब्बला 13 लाख रुपयांना विकला गेला.

महाकाय मासा पहायला मोठी गर्दी - 

एका परदेशी कंपनीने त्याला विकत घेतले. या बहुमोल माशापासून जीवरक्षक औषधे बनवली जातात. म्हणूनच तो इतका महाग आहे. सामान्यत: या प्रजातीचा मासा खोल समुद्रातच आढळतो. क्वचितच ते किनाऱ्याजवळ येतात. जो मासा रविवारी पकड्यात आला ती मादा होती. तसेच गर्भवती अवस्थेत होती. तिच्या अड्यांचे वजन पाच किलो इतके होते. दीघामध्ये या माश्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

जवळपास तीन तास त्यावर बोली चालली. ही मासा संकर प्रकारातील होता. म्हणजे यात नर आणि मादी दोन्ही प्रकारचे गुण होते. यावर्षी जानेवारी महिन्यात मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्यात 121 भोला मासे अडकले. त्यांचे प्रत्येकाचे वजन 18 किलो इतके होते.

दरम्यान, तेलिया भोला मासा हा इतका महाग असल्याचे कारण त्याचे पोट हे आहे. त्यात अनेक फायदेशीर घटक आढळतात. या माशाचे सर्वात मोठे खरेदीदार औषध कंपन्या आहेत. या माशांच्या पोटातील चरबीपासून अनेक जीवरक्षक औषधे बनवली जातात. या माशाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याचा रंग सोनेरी असतो.

हेही वाचा - तुमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशीप टिकेल का? 6 सेकंदात या Optical Illusion मधून मिळेल उत्तर!

हा मासा खोल समुद्रात पाहायला मिळतो. मात्र, प्रजनन कालावधीमध्ये तो किनाऱ्यावर, जवळपास असलेल्या नदींमध्ये आढळतो. दरम्यान, या घटनेच्या सहा दिवसांपूर्वीच एक नर तेलिया भोला मासा 9 लाख रुपयांमध्ये विकला गेला होता. दीघा फिशरमैन अँड फिश ट्रेडर्स एसोसिएशनचे सदस्य नबकुमार पायरा यांनी सांगितले की, हा मासा खूप कमी वेळा जाळ्यात अडकतो.

First published:
top videos

    Tags: Fish, West bengal