महिला तहसीलदाराला जिवंत जाळल्या प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू!

महिला तहसीलदाराला जिवंत जाळल्या प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू!

महिला तहसीलदाराला कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देणाऱ्या घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

  • Share this:

हैदराबाद, 05 नोव्हेंबर: महिला तहसीलदाराला कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देणाऱ्या घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापुरमेट एका व्यक्तीने तहसीलदार विजया रेड्डी यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात विजया यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या चालकाचा आज मृत्यू झाला.

सोमवारी दुपारी 1.40च्या सुमारास तालुक्यातील गौरेली गावातील रहिवासी के.सुरेश तहसीलदार कार्यालयात आला. काही मिनिटे तो विजया रेड्डी यांच्याशी बोलला आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. विजया यांना वाचवण्यासाठी त्यांचा चालक आणि अन्य एका कर्मचाऱ्याने प्रयत्न केला होता. या प्रयत्नात विजया यांचा चालक गुरुनाथ 60 टक्के भाजला होता. सोमवारी विजया आणि त्यांना वाचवणाऱ्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील विजया यांचा कालच मृत्यू झाला तर आज उपचारा दरम्यान गुरुनाथम यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस आयुक्त महेश एम भागवत यांनी पीटीआयला सांगितले.

तहसीलदार विजया यांच्यावर हल्ला करणारा के. सुरेश हा सुद्धा यात जखमी झाला होता. एका जमीनीच्या वादावरून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे. चौकशीसाठी पोलीस सुरेश याचे फोन कॉल देखील तपासत आहेत.

VIDEO : राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि राज्यात कधी लागू झाली?

First published: November 5, 2019, 5:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading