Home /News /national /

7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य कोरोनामुक्त होणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य कोरोनामुक्त होणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

22 मार्चपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आतापर्यंत आम्ही 25 हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केलं आहे.

    हैदराबाद, 30 मार्च : जगभरात कोरोनानं हाहाकार पसरला आहे. आतापर्यंत 31 हजार लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांवर उपचार सुरू आहेत. भारतातही आतापर्यंत एक हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यं 27 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 186 वर गेली आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र त्यानंतर केरळ 182, कर्नाटक 76 आणि त्यानंतर तेलंगणा 70 रुग्ण आहेत. तेलंगणा राज्य 7 एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर ते म्हणातात की आतापर्यंत तेलंगणात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. 7 एप्रिलपर्यंत तेलंगणा राज्य कोरोनामुक्त करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सलाम! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी 450 किमी पायी प्रवास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. यांनी सांगितले की राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण या व्हायरसवर यशस्वीपणे मात देत आहेत. रुग्णांनी औषधांनाही चांगला प्रतिसाद दिला आहे. तर नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसत आहे. 22 मार्चपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आतापर्यंत आम्ही 25 हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केलं आहे. अनेक जणांची चाचणी केल्यानंतर 70 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 रुग्ण बरे झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी एखाद दोन रुग्ण वगळता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांनाही उपचारानंतर 7 एप्रिलपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारपर्यंत 155 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आहे. मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून जर्मनीतील मंत्र्याची आत्महत्या
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या