अमानुषपणाचा कळस! पोलिसांकडून मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनाच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

अमानुषपणाचा कळस! पोलिसांकडून मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनाच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

संरक्षण करणारे पोलीस जेव्हा गैरवर्तन करतात, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

  • Share this:

संगारेड्डी, 27 फेब्रुवारी : नागरिकांचं संरक्षण करणारे वर्दीतले पोलीस जेव्हा नागरिकांनाचा बेदम मारहाण करत सुटतात तेव्हा पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्हं उपस्थित होतं. संरक्षण करणारे पोलीस चक्क एका मृत विद्यार्थीनीच्या वडिलांसोबत गुंडासारखे वागल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

मंगळवारी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नारायणा जुनियर कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाला नेण्यासाठी विरोध केला. मुलीच्या जाण्याचा त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांनी मुलीच्या मृतदेहाला पोलिसांना हात लावण्यास विरोध केला. मुलीच्या शरीराचं शवविच्छेदन होऊ नये म्हणून त्यांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर आणला. मात्र ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी वडिलांच्या हातून मृतदेह ताब्यात घेत शवागारात नेला. मात्र वडिलांनी पोलिसांना अडवून विरोध केल्यानं संतप्त पोलिसांनी मुलीच्या मृतदेहासमोरच वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांना मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांचं हे वर्तन समजण्यासारखं होतं मात्र पोलिसांनी अशा अमानुषपद्धतीनं मारहाण करणं किती योग्य आहे? असे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा-दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुनावणी करणाऱ्या हायकोर्टातील जजची रातोरात बदली

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. अक्षरश: मृत मुलीच्या वडिलांना पोलिसांनी बेदम लाथांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी घेतलेल्या या अॅक्शनमुळे गावात चर्चेचा विषय झाला असून सध्या काहीसा तणाव आहे. पोलिसांचा या कृतीमुळे गावातील नागरिकांच्या मनात संतापाचं वातावरण आहे. मात्र या युवतीनं आत्महत्या का केली याचं कारणही अद्याप समोर येऊ शकलं नाही. यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. मात्र पोलिसांनी केलेल्या गैरवर्तानावर आयुक्त काही कारवाई करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा-दिल्लीतल्या हिंसाचारावरून सुपरस्टार रजनीकांतची केंद्रावर सडकून टीका

First published: February 27, 2020, 9:07 AM IST

ताज्या बातम्या